vitthal.jpg 
सोलापूर

निर्णयाचे स्वागत पण गर्दीवर नियंत्रण राखण्याचे आव्हान 

अभय जोशी

पंढरपर(सोलापूर) ः गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर पाडव्यापासून (सोमवार) खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकरी, महाराज मंडळींच्या बरोबरच व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे कार्तिकी यात्रेसंर्दभात शासनाकडून अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचे तसेच गर्दीवर नियंत्रण राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. 

दरम्यान, 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. दरवर्षी एकादशीच्या चार दिवस आधीपासून भाविकांची पंढरपुरात गर्दी होत असते. गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद होते. त्यामुळे यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्त संख्येने भाविक येण्याची शक्‍यता आहे. अद्याप शासनाने यात्रेच्या विषयी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे यात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने भाविक आले तर त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचे तसेच गर्दीवर नियंत्रण राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल. 

अद्याप कोरोनाचा धोका पूर्ण संपलेला नसल्याने श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देणे, थर्मल तपासणी करणे, भाविकांनी मास्क घातला आहे का पहाणे या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यामुळे दर्शनाला वेळ लागण्याची शक्‍यता आहे. दर्शनाला वेळ लागल्यास रांग लांबवर जाऊन पोलिस प्रशासनासह यंत्रणेवर ताण येण्याची शक्‍यता आहे. श्री विठ्ठल मंदिरात पाडव्यापासून थेट पदस्पर्श दर्शनास परवानगी दिली जाणार का, सुरुवातीचे काही दिवस मुखदर्शन सुरु केले जाणार या विषयी अद्याप स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. दरम्यान, वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संत नामदेव पायरीजवळ पेढे वाटून मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. प्रामुख्याने परगावाहून दशर्नासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी देखील आज समाधान व्यक्त केले. 

पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील भाविकांच्या प्रवेशाविषयीची आदर्श कार्यप्रणाली अद्याप आम्हाला मिळाली नाही. शासनाकडून जसे निर्देश येतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. 17 मार्चपासून मंदिर भाविकांसाठी बंद होते. त्यामुळे भाविकांच्या देणग्यांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते. त्यामुळे आतापर्यत मंदिर समितीचे सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
- सुनील जोशी, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT