naagpanchani.jpg 
सोलापूर

सोलापूरमध्ये कोणत्या प्रकारचे साप आढळतात आणी त्यांचे रक्षण करण्याचे प्रयत्न कसे? ते वाचा 

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः सोलापूर परिसरात विषारी सापांच्या तुलनेत बिनविषारी सापांचा वावर अधिक आढळतो. त्यामुळे हे साप मारण्याच्या ऐवजी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. साप बाळगून त्याच्या खेळ करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होत आहे. जनजागरण करणाऱ्या पर्यावरण संघटना व नागरिकांच्या सापाबद्दलच्या शास्त्रीय दृष्टीकोनामुळे हा बदल दिसतो आहे.

शहरामध्ये सर्वाधिक संख्येने तस्कर (ट्रिंकेट) हा साप आढळतो. ग्रामीण भागातील शेतामध्ये धामण, इरोळे, गवत्या, काळतोंड्या, मृदकाय, रसलकुकरी, बॅंडेड कुकरी, कवड्या, वाळा आदी प्रकार सापडतात. कवड्या सापाचे तीन प्रकार आहेत. सोलापुरात एकूण 26 प्रजातीचे साप आढळतात. त्यात हरण टोळ व मांजऱ्या दोन निमविषारी प्रजातीचे साप आढळतात. सोलापुरात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे प्रमुख चार विषारी साप आढळतात. मनुष्य वस्तीत न येणारा विषारी साप म्हणजे पोवळा हा होय. हा साप अत्यंत दुर्मिळ आहे. हा साप पेनाच्या कांडीच्या जाडीचा असतो व एक फुट लांबीचा असतो. त्याचे दात अत्यंत लहान असल्याने विषारी असूनही त्याचा मानवी त्वचेला दंश लागत नाही. 

गेल्या काही वर्षात सापांच्या संरक्षणासाठी झालेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सापांचा खेळ करून त्या आधारावर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना हा प्रकार थांबवण्यास सांगून इतर मार्गाने उदरनिर्वाहाची सोय लावण्यास सांगण्याची मोहिम राबवली गेली. त्यामुळे आता अशा प्रकारे साप बाळगणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 
कोणत्याही भागात साप सापडला तर त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्प अभ्यासकांची टीम तयार झाली आहे. आता शहराच्या सर्वच भागात साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणाऱ्या निसर्ग मित्रांची संख्या सातत्याने वाढते आहे. या कामाचा परिणाम म्हणून केवळ भीतीपोटी व अज्ञानातून साप मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांमध्ये विषारी व बिनविषारी सापामधील फरक ओळखण्यासाठी केलेला प्रचार उपयुक्त ठरला आहे. 
सापाबद्दलचे गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. नागाच्या डोक्‍यावर नागमणी असतो, धामण म्हशीच्या पायाला वेटोळा घालून दूध पिते, सापाच्या अंगावर केस असतात, साप दूध पितो या सह अनेक प्रकारच्या गैरसमज दुर केले जात आहेत. 
सापामुळे शेती व पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरावर नियंत्रण आणले जाते ही बाब ग्रामीण भागात रुजवण्याचे काम होत आहे. एक धामण वर्षभरात दोनशेपेक्षा जास्त उंदीर फस्त करते. त्यामुळे धामणसारखे साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत ही बाब अधोरेखित केली जात आहे. नागपंचमीच्या सणाच्या माध्यमातून सापांबद्दल शास्त्रीय माहिती व त्यांची जैवसाखळीतील महत्व यावर प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत.

कायद्याचा धाक महत्वाचा 
 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या कायद्यानुसार साप मारणे, साप बाळगणे, सापांचा छळ करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी वनविभागाच्या टोल फ्री क्र. 1926 ला माहिती कळवता येते. 
- संतोष धाकपाडे, सर्परक्षक बाळे. 

सापांचे रक्षण करण्याचे प्रमाण वाढले 
नागरिकामध्ये सापाबद्दलची जागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने घराच्या परिसरात साप आढळल्यास आता नागरिक सापास न मारता ते पकडून परिसरातील अधिवासात सोडून देतात. त्यामुळे साप मारण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. 
- अजित चव्हाण, सदस्य, नेचर कॉन्झरव्हेशन सर्कल सोलापूर 


बिनविषारी सापांची संख्या अधिक 
नागरिकांना एकदा विषारी साप ओळखता आले तर इतर बिनविषारी सापाला ते पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडू शकतात. त्यासोबत विषारी सापाच्या बाबत सर्पदंशाचे उपचार उपलब्ध असतात. 
- पंकज चिंदरकर, सदस्य, नेचर कॉन्झरव्हेशन सर्कल जुळे सोलापूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT