What MP Ranjit Singh Naik Nimbalkar told the Governor
What MP Ranjit Singh Naik Nimbalkar told the Governor 
सोलापूर

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काय सांगितले राज्यपालांना

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कौशियारी यांची भेट घेऊन कोरोना व्हायरस संदर्भात चर्चा केली. राज्यपालांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अशी त्यांनी विनंती केली. देशामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने उग्ररूप धारण केले असताना देशातील कोरोनाच्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यामध्ये अत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असताना राज्य सरकार यामध्ये कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत. विशेषतः मोल मजुरांचा प्रश्‍न, कोरोना पेशंटच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशीन वाटप आदी प्रश्‍न गंभीर आहेत. सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. राज्य सरकारविरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. विरोधी पक्षाने दिलेल्या सल्ल्यांचा विचारही केला जात नाही. केंद्र सरकारने दिलेली आर्थिक मदत अद्याप वापरली गेलेली नाही. त्याची माहिती दिली जात नाही. फक्त बैठका घेतल्या जातात. परंतु निर्णय घेतले जात नाहीत. मुख्यमंत्री महाराष्ट्रात दौरा करत नाहीत. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्‍यता आहे. यावर ठोस भूमिका घेतली जात नाही. कोरोना पेशंटचे टेस्ट किती घेतात हे समजत नाही. राज्य सरकार वस्तूस्थिती लपवत आहे. 
शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा प्रशासनाचा कोणताही ठोस उपाय या आजारावर दिसत नाही, अशा अनेक बाबी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. आपण यावर तातडीने लक्ष घालून राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडावे अशीही मागणी या पत्रामध्ये केली आहे. यावेळी आमदार जयकुमार गोरे, राहुल कुल उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT