doctor.jpg 
सोलापूर

सोलापूरची कोरोना रुग्णसंख्या व मृत्यदराबद्दल वैद्यकीय क्षेत्राचे मत आहे तरी काय? वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः सोलापूरमधील वाढत्या मृत्युदराच्या संदर्भात वेगवान सर्वेक्षणाचा अभाव, कोरोना टेस्टची मर्यादित संख्या व आजाराच्या प्राथमिक टप्प्यातील संशयित रुग्ण उपचाराच्या टप्प्यात न येणे ही तीन कारणे प्रामुख्याने मांडली जात आहेत. 

सोलापूरमध्ये मृत्युदर वाढत का आहे या प्रश्‍नाभोवती वैद्यकीय क्षेत्र सातत्याने विचार करीत आहे. कोविड रुग्णालये सुरू झाल्यानंतर मृत्युदर काही प्रमाणात कमी होईल असे मानले जात होते. प्रत्यक्षात मृत्युदर कमी झालेला नाही असेही आढळून आले आहे. केवळ ज्या रुग्णांना सिव्हिलची सेवा न घेता खासगी रुग्णालयातील सेवा हवी होती त्यांची सोय झाली आहे. तसेच कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोरोना आजारात मृत्युदर सोलापूरमध्ये तुलनेने खूप अधिक आहे. त्याला आवर कसा घालता येईल याचा अभ्यास केला जात आहे. 

शहरातील विविध प्रभागात असलेल्या सर्वेक्षण टीम कमी पडत आहेत. कोरोना आजार झाल्यानंतर प्राथमिक स्थितीत असलेल्या रुग्णांची नोंद सर्वेक्षण चमूकडे होत नाही. लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या बाबतीत या चमूला काही अंदाज लागणे शक्‍य नाही. या सर्वेक्षणाचे सूक्ष्म नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मनुष्यबळ कमी असेल तर पोलिस यंत्रणेने ज्या प्रमाणे स्थानिक तरुणांची मदत घेतली त्याप्रमाणे मनपाला नागरिकांची मदत घेता येईल. आजाराची स्थिती गंभीर झाल्यानंतरच कोरोना टेस्ट व उपचार सुरू होतात. सर्वेक्षण टीमने रुग्णांचा शोध आजाराच्या प्राथमिक स्थितीत घेणे आवश्‍यक आहे. रुग्णांच्या आजाराने गंभीर रूप धारण केल्यानंतर उपचार अनेकवेळा अपुरे पडतात. 
सध्या खासगी दवाखान्यात जे संशयित रुग्ण जातात त्यांची माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉक्‍टर वैयक्तिक बोलून किंवा मेसेजद्वारे देतात. मात्र संबंधित रुग्ण मनपाच्या फीव्हर क्‍लिनिकमध्ये न जाता परस्पर घरी निघून जातो. त्यामुळे त्याची नोंद होत नाही. त्याबाबतचा पाठपुरावा मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडून होत नाही. खासगी डॉक्‍टराकडून येणारी संशयित रुग्णांची माहिती मध्यवर्ती पद्धतीने नोंदवली तर प्रत्येक संशयित आजार बळावण्याआधीच सापडू शकेल असे खासगी डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. खासगी डॉक्‍टर व मनपाची आरोग्य यंत्रणा यांना डावलून जाणाऱ्या या संशयितांची संख्या भरपूर आहे. त्यांचा वेळीच शोध घेऊन उपचार करणे आवश्‍यक झाले आहे. 
कोरोना टेस्टची संख्या मर्यादा देखील महत्त्वाची ठरत आहे. या टेस्ट आजार प्राथमिक अवस्थेतील रुग्णांची होणे आवश्‍यक आहे मात्र त्या गंभीर स्थितीत सापडलेल्या रुग्णासाठी केल्या जात आहेत. कोरोना टेस्ट अधिक केल्या तर ते चांगले असणार नाही असे मानले जाते. पाचशे टेस्टची मर्यादा आहे. पण त्याही पेक्षा कमी टेस्ट होतात व या टेस्ट प्राथमिक अवस्थेतील रुग्णासाठी होत नाहीत. अँटीजन टेस्टने त्यामध्ये फरक पडेल अशी आशा आहे. 

मास्कचा वापर महत्वाचा 
शहरातील अनेक वसाहती व वस्त्यांमध्ये नागरिकाकडून मास्कचा वापर केलाच जात नाही. मास्क शिवाय फिरण्यास बंधन घालण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होतो व लक्षणे नसलेले रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतात. लक्षणे नसल्याने ते रुग्ण आहेत हे समजत नाही. या बाबत मास्कची सक्ती व कारवाई केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. 

डॉक्‍टर व मनपात समन्वयाचे नवीन मुद्दे समोर यावेत 
जे रुग्ण खासगी डॉक्‍टराकडून मनपा किंवा सिव्हिलकडे रेफर केले जातात ते प्रत्यक्षात तेथे न जाता घरी निघून जातात. नंतर ते दोन्ही दवाखान्यात परत येत नाहीत. नंतर हे रुग्ण नंतर कोरोनाच्या गंभीर स्थितीत गेल्यावर सिव्हिलमध्ये किंवा इतर दवाखान्यात गेल्यानंतर कोरोना टेस्टमध्ये समजते. खासगी डॉक्‍टर व शासकीय यंत्रणा यामध्ये या रुग्णासाठी सर्वाधिक समन्वय हवा. 
- डॉ.विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय अध्यक्ष, निमा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT