E PASS.jpg 
सोलापूर

ई-पास बद्दल सोशल मिडीयावर होणाऱ्या अफवा बद्दल पोलिसांनी काय मांडली भूमिका? 

मिलिंद गिरमे

लवंग(सोलापूर) ः सोशल मिडियावर पाच ऑगस्टपासून राज्यात प्रवासाला ई पास ची आवश्‍यकता नाही अशा प्रकारच्या पोस्ट पसरवणे सुरू आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रवासासाठी जिल्हा बंदीचे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा बंदीमुळे जिल्ह्यातून किंवा राज्या बाहेर जाण्यासाठी ई-पास अनिवार्यच राहणार आहे. 

सोशल मिडियावर पाच ऑगस्टपासून राज्यात प्रवासाला ई पास ची आवश्‍यकता नाही अशा प्रकारच्या पोस्ट पसरवणे सुरू आहे. अशा संदर्भात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. 

राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन वाढल्यानंतर काही बाबींमध्ये अनलॉक मध्ये थोड्या प्रमाणात काही सवलती शासनाने दिल्या असल्यातरी शासनाकडून जिल्हा बंदी बाबत कोणत्याही नव्याने सूचना न आल्याने प्रवासासाठी जिल्हा बंदीचा आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे.असे शिंदे यांनी सांगितले. 
जिथे प्रशासनाकडून कन्टोनमेंन्ट भाग घोषित केला गेला आहे तिथे पास मंजूर केला जात नाही. मात्र आपत्कालीन स्थिती, कामाची निकड, कामाचे महत्त्व, वैद्यकीय कारण अशा आवश्‍यकतेनुसार ई पासेस दिले जात आहेत. वाढत्या कोरोना संदर्भाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करून संसर्ग रोखण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात व अन्य राज्यात अत्यंत गरजेच्या कारणास्तव येणे जाणे करिता पोलिसांकडून डिजिटल ई पासची सुविधा देण्यात आलेले आहे. ऑनलाईन ई पास मागणी करताना खरी माहिती भरली गेली पाहिजे असे ही त्यांनी स्पष्ट केले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT