students.jpg
students.jpg 
सोलापूर

दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेण्यापुर्वी विद्यार्थी व पालकांनी काय केले पाहिजे? ते जाणुन घ्या 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः दहावीचा निकाल लागल्यानंतर स्वतःची आवड, पालकांशी चर्चा, समुपदेशकांचा सल्ला या तिन्हीच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश ठरवावा लागणार आहे. ही निवड महत्वाची ठरणार आहे. 

गुणांपेक्षा आवड महत्वाची 
दहावीचा निकाल लागल्याने आता पुढे महाविद्यालयात कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याची प्रत्येक विद्यार्थ्यासमोर महत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पहिलीपासून शाळेतील वर्गमित्र कशाला प्रवेश घेणार त्याच्या सोबत अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्याचा विचार विद्यार्थी करतात. पालक देखील दोन वर्गमित्रांना सारखे गुण असतील तर पुढे एकाच शाखेच्या वर्गात प्रवेश घ्या असा सल्ला देतात. पण प्रत्यक्षात या दोन्ही बाबी पुढील वर्गाचा व करिअरसाठी सर्वात धोकादायक आहे. 

कलचाचणी व मैत्रीपूर्ण संवाद 
दहावीच्या कलचाचणीचा विचार यावेळी पालकांनी करायला हवा. विद्यार्थ्यांची तांत्रिक, गणिती, भाषिक, अवकाशीय आदी क्षमतांची तपासणी करून काढलेले कलचाचणीचे निष्कर्ष तपासावे लागतील. तसेच विद्यार्थ्यांना कशाची आवड महत्वाची असेल. तसेच पालकांना त्याच्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवादातून हे साध्य होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीनुसार करिअर न देता गुणांच्या आधारावर अभ्यासक्रम निवडला तर करिअरमध्ये अपयश येऊ शकते. 

करिअरसाठी नवी क्षेत्रे 
दहावीनंतर विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे करिअरचे मार्ग उपलब्ध आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांमध्ये प्रवेश घेताना मेडीकल व इंजिनिअरींगच्या पलिकडे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अगदी आयटीआय, तंत्रनिकेतन पदवीका यासारख्या अनेक मार्गाचा पर्याय असणार आहे. शेकडो कोर्सेस उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी निवडलेल्या कोर्समध्ये प्राविण्य मिळवले की तो करिअरमध्ये यशस्वी ठरु शकेल. अगदी चित्रकला, भाषाविकास, शेती, अभिनय, नृत्य, मातीकाम अशा अनेक विषयात करिअरची संधी आहे. 

गुण कमी असो वा जास्त संधी सर्वांनाच 
एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण असले तरी त्याची तांत्रिक क्षमता किंवा इतर क्षमता ओळखल्या तर त्याला क्षमतेच्या आधारावर मोठे करिअर करता येते. दहावीच्या गुण हे विद्यार्थी हुशार किंवा कमी हुशार असे ठरवणे चुकीचे आहे. तर पुढे बारावीची संधी व आवडीच्या करिअरमधील कामगीरीने विद्यार्थ्याचे करिअर सिध्द होते. गुण जास्त मिळाले म्हणून विज्ञान शाखा निवडावी किंवा कमी गुण मिळाले तर कला शाखा घ्यावी हा निकष चुकीचा आहे. 

आवडीचा विचार मांडावा 
विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता व आवडीबद्दल पालकांनी समुपदेशकांना बोलावे. तसेच महा करिअर पोर्टलवर माहिती घ्यावी. 
- बी.डी. शिंदे, जिल्हा समुपदेशक डायट, वेळापूर 

पालकांनी लक्ष देण्याची वेळ 
विद्यार्थ्यांच्या क्षमता जोखून पालकांनी योग्य मार्गदर्शन करावे. पालकांना हे शक्‍य नसेल तर समपदेशकांचा व शिक्षकांचा सल्ला देखील घेता येणार आहे. त्याचा विचार अकरावी प्रवेशाच्या वेळी केला पाहिजे. 
- प्रताप तोरणे, समुपदेशक, डायट वेळापूर 


समुपदेशक सल्लासेवा उपलब्ध 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) वेळापूर ने दहावीच्या विद्यार्थ्याना पुढील करिअर मार्गदशनासाठी पाच समुपदेशक उपलब्ध केले आहेत. या समुपदेशकांना विद्यार्थी व पालकांना जिल्हा समुपदेशक बी.डी.शिंदे यांच्या मोबाईल व व्हॉटसऍप क्रमांक 9561665777 वर कॉलद्वारे किंवा मेसेज टाकून मार्गदर्शन मिळवता येईल. या शिवाय महाकरिअर पोर्टलवर दोन लाख साठ हजार कोर्सेसची माहिती उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT