Cylinder 
सोलापूर

पंढरपुरात गॅसचा स्फोट, मोटारसायकल जळून खाक; सुदैवाने जीवित हानी टळली

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरात आज बुधवारी (ता. 12) दुपारी बेकायदेशीरपणे गॅस भरताना गॅस टाकीचा स्फोट झाला. यामध्ये पत्र्याची खोली जळून खाक झाली. ही घटना शहरातील महात्मा फुले चौकात घडली. शहराच्या मध्यवस्तीत गॅसचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामध्ये एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे. चौकातील एका पत्र्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक आहे.

स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग विझवली. वेळीच आग विझवल्याने जीवित हानी टळली. स्फोट झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस स्फोट प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT