Gautami Patil Esakal
सोलापूर

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; प्रेक्षकांनी चक्क...

अलिकडेच तिच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याच्या बातम्या

सकाळ डिजिटल टीम

आजकाल रोजच चर्चेत असणारी लावणी कलावंत गौतमी पाटील राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी झालेली दिसून येते. आपल्या दिलखेचक अदा आणि डान्समुळे तरुणाईसह इतर वयोवर्गातील लोक तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी दिसून येते. अलिकडेच तिच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याच्या बातम्या समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली येथील बेडगमध्ये लोकांनी सरकारी शाळेचे कौलारू छत फोडले. झाडे पाडली. गौतमीच्या एका कार्यक्रमादरम्यान एक मृतदेह आढळून आला होता त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान आताही गौतमीच्या कार्यक्रमांना तुफ्फान होत आहे.

काल सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती. बसायला जागा नव्हती त्यामुळे तरुणांनी कार्यक्रमात राडाच घातला. तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

सोलापूरमधील नातेपुते गावात गौतमीच्या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांची प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त झाल्यामुळे बसायला जागाच उरली नसल्यामुळे तरुणांनी खुर्च्या फेकल्या आणि जागा मिळेल तिथे उभं राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा डान्स सुरू असतानाच हा गोंधळ सुरू झाला.

गौतमीच्या डान्सवर, गाण्याच्या ओळींवर आणि तिच्या दिलखेच अदांवर नातेपुतेकर थिरकले. यावेळी कोणी फेटे उडवले, टोपी उडवली हे असं चित्र तिच्या कार्यक्रमात दिसून आलं. दरम्यान, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लोकांना वेळीच सावरण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT