bail.jpg 
सोलापूर

शेतीच्या कामांसाठी आधी जनावरांचा बाजार सुरू करा, कोणी केली मागणी 

सकाळ वृत्तसेवा

मळेगाव(सोलापूर)ः राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बार्शी तालुक्‍यातील गौडगाव येथील आठवडी बाजार बंद करण्यात आला. दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद झाल्याने गौडगाव परिसरातील शेतकरी, व्यावसायिक, मजूर यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. तसेच जनावरांचा बाजार देखील बंद झाल्याने कोणी बैलजोडी देता का? म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

गौडगाव येथील जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्याचे निवेदन गाव कामगार तलाठी डी. एस. वाघमारे यांच्यामार्फत बार्शी तहसीलदार यांना देण्यात आले. 
ग्रामीण भागाचे अर्थकारण व उदरनिर्वाह पूर्णपणे शेती व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. गाय, म्हैस, शेळी या जनावरांपासून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी जनावरांची देवाण-घेवाणच होत नसल्यामुळे संकटात सापडले आहेत. रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

खरीप पेरणीला सध्या सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणीच्या काळात जनावरांचा बाजार बंद असल्याने बैलजोडी मिळणे मुश्‍कील झाले आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर होण्यासाठी गौडगाव येथे जनावरांचा आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी रऊळगाव, ढेकरी, झरेगाव, रुई, आळजापूर, भालगाव, संगमनेर, निंबळक येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, कासारीचे सरपंच प्रभाकर कापसे, रऊळगावचे सरपंच सत्यवान भोसले, संजय भड, झरेगावचे बाळासाहेब केसरे, सतीश भड, भास्कर काकडे, अमोल शेळके उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT