kurduwadi.png 
सोलापूर

कुर्डुवाडीत कोरोनाचा शिरकाव होताच दहा दिवसाच्या लॉकडाउनची मागणी कोणी केली? ते वाचा 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी(सोलापूर): कुर्डुवाडी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग सतर्क झाले असून ता 18 ते 28 या लॉकडाउनमध्ये सोलापूर शहराबरोबर कुर्डुवाडीचाही समावेश करावा, असे पत्र नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे पाठवले आहे. 

शहरातील टेंभुर्णी रस्त्यालगत असलेल्या साई कॉलनी परिसरात एक व देवकते वस्ती येथे एक असे दोन जणांचे कोरोनाबाणित आढळले आहेत. संबंधित परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. 

नगरपालिका आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात फवारणी केली. पोलिस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन कार्यवाही सुरु केली. त्या दोघांच्या अतीसंपर्कातील लोकांचे स्वॅब पाठवण्यात येणार असून कमी संपर्कातील लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर मुलाणी व नगरसेवकांनी चर्चा केली. प्रतिबंधित केलेले दोन्ही परिसर दाट लोकवस्तीचे आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सदर कालावधीत लॉकडाउनमध्ये सोलापूर शहराबरोबरच कुर्डुवाडी शहराचाही सामावेश करावा असे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे पाठवण्यात आले आहे. 

रिधोरेत चार नवे रूग्ण 
आज भोसरे येथेही एक जणाचा कोरोना अहवाल बाधित तर रिधोरे येथे चार जणांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. आजपर्यंत तालुक्‍यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34 झाली असून यातील लऊळ, चिंचगाव व मोडनिंब येथील प्रत्येकी एक असे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Accident: दुर्घटनेत शेतकरी कुटुंबाला मिळणार ५ लाखांपर्यंत मदत; भूमिहीन मजूर अन् बटाईदारांनाही संरक्षण, जाणून घ्या नियम!

राखी आरोग्यबंधन

Sanskrit School Students: संस्कृत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी ७०० रुपयांपर्यंत वार्षिक मदत; काय आहे अर्ज प्रक्रिया?

ढिंग टांग : यह राखी बंधन है ऐसा..!

Ved Vyas Housing Scheme : मच्छीमारांना पक्क्या घरासाठी १ लाख २० हजारांची मदत; जाणून घ्या वेद-व्यास योजनेची माहिती

SCROLL FOR NEXT