gharkul.jpg 
सोलापूर

गृहनिर्माण संस्थाकडून देखभाल शुल्कावरील व्याज वसुलीला विरोध कोणी केला? ते वाचा 

भारत नागणे

पंढरपूर(सोलापूर)ः लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अजूनही उद्योग,व्यापार, व्यवसाय ठप्प आहे. अशा संकट काळात सर्वसामान्य लोकांना मदतीची गरज आहे. परंतु मदत करण्याऐवजी राज्यभरातील गृह निर्माण संस्थांनी देखभाल शुल्कावर व्याज आकारणी करुन सभासदांकडून त्याची वसुली सुरु केली आहे. या प्रकरणी मनसेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

राज्यात जवळपास 60 टक्‍क्‍याहून अधिक भागात नागरीकरण झाले आहे. सर्वच छोट्यामोठ्या शहरांमध्ये व नागरी वस्त्यांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जाळे पसरले आहे. 
राज्यात जवळपास 1 लाख 7 हजार 372 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांमध्ये 30 लाख 43 हजार सभासद आहेत. गृहनिर्माण संस्थांकडून प्रत्येक सभासदांना देखभाल शुल्क आकारले जाते. 

गेल्या चार महिन्यांपासून राज्यभरात कोरोनाचे साथ सुरु आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या रोजरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांकडे देखभाल शुल्काची रक्कम थकली आहे. त्या थकीत शुल्कावर आता या संस्थांनी व्याजाची आकारण केली आहे. 
व्याजासह थकीत रक्कम वुसलीसाठी संस्थांनी सभासदांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसेच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही त्यांनी लेखी निवेदन देवून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे, सचिव प्रमोद पाटील, सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे, कोषाध्यक्ष वल्लभ चितळे, उपाध्यक्ष कौस्तुभ लिमये आदी उपस्थित होते. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT