43Election_Housing.jpg
43Election_Housing.jpg 
सोलापूर

जनता बॅंक कोणाची? ! 53 हजार 334 पैकी 30 टक्‍केच मतदान; मंगळवारी नुतन मराठी विद्यालयात मतमोजणी

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बॅंकेची निवडणूक 2010 नंतर प्रथमच झाली. या निवडणुकीत दहा अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली. दुसरीकडे सत्ताधारी परिवार पॅनल तर बॅंक बचाव पॅनलचे प्रत्येकी 17 उमेदवार रिंगणात होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मतपत्रिकेवर ही निवडणूक पार पडली. एकूण 44 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मतमोजणी आता 16 मार्च रोजी होणार आहे. नुतन मराठी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

ठळक बाबी... 

  • सोलापूर जनता बॅंकेसाठी आज झाले मतदान; मंगळवारी (ता. 16) मतमोजणी 
  • 53 हजार 334 जण आहेत बॅंकेचे सभासद; सोलापूरसह परजिल्ह्यातील व परराज्यातीलही सभासद 
  • शहरातील 30 हजार तर ग्रामीणमधील सुमारे 10 हजार सभासद मतदार 
  • पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीडसह अन्य जिल्हे व विजयपूर येथील अंदाजित 14 हजार सभासद 
  • कोरोनामुळे परराज्यातून व परजिल्ह्यातील मतदारांनी फिरविली पाठ 
  • दुपारी चार वाजेपर्यंत 25 टक्‍के तर पाच वाजेपर्यंत 30 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्याचा अधिकाऱ्यांची माहिती 


बॅंकेचे कार्यक्षेत्र दोन राज्यात असून सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल 40 हजारांपर्यंत सभासद आहेत. तर उर्वरित सभासद विजयपूरसह (कर्नाटक) पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद अशा खानदेश, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील सभासद आहेत. सध्या कोरोनाचा जोर वाढू लागल्याने बाहेरील सभासदांनी मतदानासाठी पाठ फिरविल्याचे पहायला मिळाले. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात झाली आणि दुपारी चार वाजेपर्यंत अवघे 25 टक्‍केच मतदान झाले होते. पुढील एका तासात अवघे पाच टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला. 2010 नंतर प्रथम बॅंकेच्या संचालकांची निवडणूक पार पडली असून यामध्ये सतीश पाटील-वडकबाळकर यांनी बॅंक बचाव पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. तर सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधारी परिवार पॅनलचे नेतृत्व किशोर देशपांडे यांनी केले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले असून मंगळवारी (ता. 16) मतदारांचा कौल समजणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT