सोलापूर

तलाठ्यांनी कशासाठी केले काम बंद 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी आजपासून पंढरपूर तालुक्‍यातील तलाठ्यांनी महसुली कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तालुक्‍यातील 48 तलाठी आणि नऊ मंडळ अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे कामकाज ठप्प झाले. 

तलाठी संघातर्फे दिले मागणीचे निवेदन 
संदर्भात आज तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना तलाठी संघाच्या वतीने मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले. मागील चार दिवसांपूर्वी सांगोला तालुक्‍यातील एका गावात अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यास गेलेल्या दोन तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्यावर अवैध वाळूमाफियांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही संशयित आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. त्यांच्यावर 307 कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली. 

कोविड-19 चे कामकाज 
या मागणीसाठी आज पंढरपुरातील तलाठी संघाच्या वतीने महसुली कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. फक्त कोविड-19 आणि नैसर्गिक आपत्तीचे कामकाज केले जाईल. इतर कोणतेही शासकीय कामकाज केले जाणार नाही, असेही संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या वेळी पंढरपूर तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस. आर. डोरले, उपाध्यक्ष बी. एम. शिवशरण, सचिव आर. एन. चव्हाण, विभागीय सरचिटणीस समीर मुजावर आदींसह तलाठी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT