0Crime_Story_0.jpg
0Crime_Story_0.jpg 
सोलापूर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, पतीस शिक्षा अन्‌ जामिनही ! चारित्र्यावर संशयावरुन पत्नीचा खून, पती पोलिस कोठडीत

तात्या लांडगे

सोलापूर : सासरच्यांकडून होणारा त्रास, पतीकडून शिवीगाळ व मारहाण, वारंवार अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून अश्‍विनी चाबुकस्वार हिने आत्महत्या केली. याप्रकरणी पती दिगंबर कृष्णात चाबुकस्वार (रा. अवंतीनगर, जुना पुना नाका) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी तीन वर्षाची सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर संशयित आरोपी दिगंबर चाबुकस्वार यास न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती संशयित आरोपीचे वकिल प्रशांत नवगिरे यांनी दिली.

अश्‍विनी यांचा 2005 मध्ये दिगंबर याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर दोन वर्षांनी दिगंबरला गांजा व दारुचे व्यसन लागले. त्यानंतर तो पत्नी अश्‍विनीस शिवीगाळ व मारहाण करीत होता. पती कामधंदा करीत नसल्याने अश्‍विनी या खासगी कंपनीत नोकरीस होत्या. सासू पद्मिनी, नणंद श्रीदेवी, दिर नवनाथ हेदेखील अश्‍विनीला त्रास देत होते. श्रीदेवी यांचा घटस्फोट झाल्याने त्यांच्या मुलांचा सांभाळ व सासऱ्यांचीही देखभाल अश्‍विनी यांनाच करावी लागत होती. तरीही सासरच्यांनी अश्‍विनीला वारंवार त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून अश्‍विनीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिसांनी पतीसह सासू, नणंद व दिरास अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात सासू, नणंद व दिरास निर्दोष मुक्‍त केले तर पती दिगंबर यास तीन वर्षाची सक्‍तमजुरी ठोठावली. त्यानंतर नवगिरे यांनी संशयित आरोपीच्या जामिनासाठी अर्ज केला. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने दिगंबर चाबुकस्वारला जामीन मंजूर केल्याचेही नवगिरे यांनी सांगितले. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. प्रेमलता व्यास यांनी तर तपासिक अंमलदार म्हणून श्‍वेताली सुतार, आर. एम. चिंताकिंदी यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती जहागिरदार यांनी काम पाहिले.


 

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून, पती पोलिस कोठडीत 

सोलापूर ः कुमठे येथील माळी गल्लीत राहणाऱ्या महेबूब हबीब शेख याने त्याची पत्नी शमशाद शेख (वय 50) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हा हल्ला केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. संशयित आरोपी महेबूब यास न्यायालयाने दोन दिवसांची (मंगळवारपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शमशाद या स्वयंपाक करत असताना महेबूब शेख याने अचानकपणे त्यांच्या मानेवर व कानावर कुऱ्हाडीचे वार केले. त्यात जखमी झालेल्या शमशाद शेख यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी महेबूब याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते. घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास गायकवाड हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT