सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केले आहे. तर पदवीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर होताच, त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. पदवी-पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिलासा तसेच नाराजीचे आणि संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा काही विषयांचा अभ्यास पूर्ण झाला नाही तर काही विषयांची सूरुवातसुध्दा झाली नाही. त्यात जुलै महिन्यात परीक्षा आहेत. परंतु त्या कालावधी पर्यंत कोरोनाचे संकट नष्ट होईल की नाही, अशा एक ना अनेक चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परीक्षा संदर्भात घेतलेल्या या निर्णयावर विद्यार्थ्यांचे काय मत आहे. त्यावर 'सकाळ'ने त्यांच्याशी साधलेला संवाद .
शेवटच्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. तर काही विषयांची सुरुवात सुद्धा झाली नाही. त्यामुळे स्वतः अभ्यास करणे अवघड झाले आहे. त्यात पास होणे ही अवघड झाले आहे. या निर्णयावर नाराज आहेच आणि थोडा दिलासा पण मिळाला आहे. कारण परीक्षा होणे हे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
- सीमा सातपुते, सामाजिक शास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना महामारीचे सावट अजून काही आटोक्यात येताना दिसत नाही. परंतु आमचे जुलै महिन्यात परीक्षा होणार आहे हे उत्तम निर्णय आहे, पण भिती देखील आहे की जुलै महिन्यांपर्यंत कोरोना व्हायरस आटोक्यात येईल की नाही, ही चिंता सतावत आहे.
- सत्यजित वाघमोडे, जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सोलापूर येथील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. परीक्षाचे प्रात्यक्षिक करणे अशक्य आहे. ते माफ करावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार सप्टेंबर महिन्यापर्यत कोणतीही लस मान्यता प्राप्त करू शकत नाही. त्यानुसार परीक्षा या संगणकीय पर्यायी पध्दतीने व्हायला हवे. कमी वेळेत परीक्षा पूर्णही होईल. परीक्षा केंद्रावर निर्जंतुकीकरण साधने उपलब्ध करावी. संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- जयप्रसाद दत्तात्रय सर्दनकर, ग्रामीण विकास व्दितीय वर्ष , सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
पदवीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय झाला. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान न्याय आणि संधी मिळेल अशा प्रकारची परीक्षा पद्धत अवलंबावी असे वाटते. परीक्षा येण्यापुर्वी किमान महिनाभर आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे.
- गौरी जोग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
जुलै महिन्यापर्यंत कोरोना संपुर्णपणे नष्ट होईल असे वाटत नाही. कोरोनाच्या धास्तीने अभ्यासावर लक्ष लागत नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी देखील अडचणी येत आहेत, यामुळे शासनाने एम सी क्यू प्रश्नामध्ये ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.
- तानाजी यादव, जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
कोरोनामुळे सध्या राज्यातील कोरोना साथीच्या परिस्थितीमुळे आणि लाॅकडाऊनमुळे परिक्षा कधी होणार असा प्रश्न पडला होता. परंतू जुलै मध्ये परिक्षा होणार हा निर्णय चांगला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक युगातील शेवटचे वर्ष असल्याने परिक्षा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्टचे नियम पाळून आम्ही परिक्षा देवू. परिक्षा होणार हे निर्णय दिलासादायक वाटते.
- भाग्यश्री बिराजदार, सामाजिक शास्त्र विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.