ट्रॅव्हल्सची 'दिवाळी' अन्‌ प्रवाशांचे 'दिवाळे'! आरटीओचे भरारी पथक हवेतच Sakal
सोलापूर

ट्रॅव्हल्सची दिवाळी अन्‌ प्रवाशांचे दिवाळे! RTO चे भरारी पथक हवेतच

ट्रॅव्हल्सची 'दिवाळी' अन्‌ प्रवाशांचे 'दिवाळे'! आरटीओचे भरारी पथक हवेतच

विजय थोरात

आरटीओचे भरारी पथक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सची दिवाळी झाली अन्‌ प्रवाशांचे दिवाळे निघाल्याची सद्य:स्थिती आहे.

सोलापूर : एसटीची (ST Bus) 17 टक्के तिकीट दरवाढ, रेल्वेला (Railway) वेटिंग त्यातच ट्रॅव्हल्स (Travels) चालकांनी एसटी बंदची संधी साधत तिकीटदरात केलेली भरमसाठ वाढ यामुळे सामान्य प्रवाशांची पिळवणूक होत आहे. आरटीओचे (RTO) भरारी पथक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सची दिवाळी झाली अन्‌ प्रवाशांचे दिवाळे निघाल्याची सद्य:स्थिती आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सोलापूर विभागातील नऊ आगारांतून एकही एसटी बस सुटली नाही. हीच संधी साधत ट्रॅव्हल्स चालकांनी केलेली मनमानी भाडेवाढ तब्बल तीनपट होती. जादा तिकीट दर घेणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आरटीओकडून दोन भरारी पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. मात्र याकडे लक्ष न देता आरटीओची भरारी पथके गायब असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे खासगी वाहनांनी आपले गाव गाठण्यासाठी प्रवासी धडपडत होते. मात्र खासगी वाहने तिप्पट तिकीट दर आकारत असल्याने अनेकांनी बसस्थानकातच बसणे पसंत केले.

मोटार वाहन कायद्याप्रमाणे एसटी तिकिटाच्या 15 टक्के ट्रॅव्हल्सचे दर असावेत. मात्र प्रत्यक्षात त्याहून जास्त तिकीटदर आकारले जात असून, प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. प्रवासी संख्येपेक्षा अधिक प्रवासी घेऊन ट्रॅव्हल्स पुणे, मुंबई, नाशिक आदी मार्गांवर धावत असल्याचे 'सकाळ'च्या पाहणीत दिसून आले. आरटीओने अशा ट्रॅव्हल्सवर थेट कारवाई करणे गरजेचे आहे.

दररोज 80 खासगी ट्रॅव्हल्स वाहने

सोलापूर शहरातून दररोज सुमारे 80 ट्रॅव्हल्स वाहनांनी प्रवासी वाहतूक होते. यातून जवळपास चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. सर्वाधिक गाड्या पुण्यासाठी धावतात. त्यानंतर मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांच्या मार्गावर देखील गाड्या धावतात.

जादा तिकीटदर आकारलेल्या ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी दोन पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तक्रार येताच अशा खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई केली जाईल.

- विजय तिराणकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या पावलावर पाऊल! कराडात प्रीतिसंगमावर यशवंतरावांना केलं अभिवादन!

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?

दोन बलूच महिलांनी आत्मघाती हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये केला विध्वंस, २४ वर्षीय तरुणीनं बर्थडेलाच घेतलेली शपथ

Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT