2crime_logo_228.jpg 
सोलापूर

शेंगदाणे घेताना महिलेचे पाकीट चोरले ! पत्नीच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा पतीचा प्रयत्न; वाचा शहरातील गुन्हेगारी 

तात्या लांडगे

सोलापूर : मधला मारुती परिसरातील लाला चुरमुरे दुकानातून शेंगदाणे घेण्यासाठी निलाफर प्यालामदी (रा. जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ) या गेल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांची नजर चुकवून चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीतून पाकीट लंपास केले. त्यात आठ हजार 250 रुपयांची रोकड आणि दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस नाईक श्री. पोळ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 

पतीकडून पत्नीच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न 
सोलापूर : पत्नीच्या अंगावर ऍसिड फेकून जखमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा राकेश जाधव (रा. एक नंबर झोपडपट्टी, जुना विजापूर नाका) असे त्या विवाहितेचे नाव आहे. श्रद्धा आणि संशयित आरोपी राकेश जाधव यांचा 2013 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर संशयित आरोपी राकेश आणि त्याच्या कुटुंबातील अविनाश चंद्रकांत जाधव, मंदा अविनाश जाधव, वर्षा अविनाश जाधव व अश्‍विनी गायकवाड यांनी विवाहात मानपान न केल्याने छळ करून माहेरून दोन लाख रुपये आण, असा तगादा लावला होता. त्यामुळे श्रध्दा माहेरी आल्या असता राकेशने श्रध्दा बसलेल्या खोलीच्या खिडकीतून तिच्या दिशेने ऍसिड फेकले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


बस प्रवासात चोरले महिलांनी दागिने 
सोलापूर : इंडी (कर्नाटक) येथून कर्नाटक परिवहन बसमधून (केए- 33, एफ- 0409) खुशबू अब्दुल तांबोळी (रा. जवळगी, अक्‍कलकोट) या सोलापुरकडे येत होत्या. त्यावेळी तीन अनोळखी महिलांनी त्यांच्या पिशवीतील 75 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (ता. 19) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तांबोळी यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. तेरामैल येथे बस थांबल्यानंतर तीन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या होत्या. आसरा चौकात उतरल्यानंतर पिशवीची चैन उघडी असल्याने पिशवीत पाहीले. त्यावेळी पिशवीतील दागिने चोरीला गेल्याचे समजले, असेही फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिस नाईक श्री. गावडे पुढील तपास करीत आहेत. 


गुगल पेवरुन महिलेची 33 हजारांची फसवणूक 
सोलापूर : मार्केट प्लेसवर रिप्लेक्‍शन दिव्यांचे फोटो मोबाईलद्वारे पाठविताना एका अनोळखी व्यक्‍तीने दिव्यांची किंमत विचारली. त्यावेळी 100 बॉक्‍स हवे असल्यास त्यासाठी बारा हजार रुपये द्यावे लागतील, असे फिर्यादी स्नेहा विपुल कुलकर्णी यांनी सांगितले. तर त्यासाठी शिपिंग चार्जेस पाचशे रुपये ज्यादा द्यावे लागतील, असेही स्पष्ट केले. पेमेंट कसे करायचे विचारल्यानंतर गुगल पेवरुन पेमेंट करा, असेही कुलकर्णी यांनी समोरील व्यक्‍तीस सांगितले. त्यावेळी पाच रुपयांचे वाउचर पाठवितो, त्यानंतर क्‍युआर कोड पाठवा म्हणून दोन टप्प्यात 32 हजार 990 रुपये समोरील व्यक्‍तीने लंपास केले. जोरासिंग असे त्या व्यक्‍तीने नाव सांगितल्याचेही कुलकर्णी यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरुन फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक श्री. चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत. 


चोरट्याने दोन लाखांची कपडे केली लंपास 
सोलापूर : जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सचिदानंद अपार्टमेंटमधील प्रवीण ट्रेडर्समधील कपड्याच्या दुकानातून चोरट्याने मंगळवारी (ता. 20) मध्यरात्री चोरी केली. दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातील दोन लाख रुपयांच्या जिन्स पॅन्टी चोरून नेल्याची फिर्याद सतीश दत्तात्रय गुर्रम (रा. यल्लीलिंग नगर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे यांच्याकडे सोपविला आहे. 


चोरट्याने केली सत्तुराची चोरी 
सोलापूर : रामवाडी परिसरात झालेल्या चोरीमध्ये चोरट्याने सत्तुराची चोरी केली आहे. याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल नागनाथ हिंगसे (रा. रामवाडी) यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. चिकन विक्रीकरिता त्यांनी रामवाडी परिसरात दुकान सुरू केले. या दुकानात चिकन तोडण्यासाठी सत्तूरसह अन्य साहित्य ठेवले होते. चोरट्याने दुकानाचा लाकडी दरवाजा उचकटून दुकानातील रक्‍कम आणि सत्तूर, गॅस टाकी चोरुन नेली. 


कौटुंबिक वादातून मारहाण 
सोलापूर : कौटुंबिक वादातून लाकडी काठीने मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक महताब सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकबर ख्वाजा जातकर व सफैन जातकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
सोमवारी (ता. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी रफिक यांच्याघरी अकबर व सैफन यांनी बहिणीला शिवीगाळ करतो का म्हणून फिर्यादी रफिक यास शिवीगाळ केली. त्याचवेळी सैपनने घराबाहेर पडलेली लाकडी काठी रफिक यांच्या डोक्‍यात मारुन जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT