arrest Sakal
सोलापूर

बार्शी जिल्हा न्यायालयासमोर महिलांचा राडा ! दोन महिलांना अटक

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी जिल्हा न्यायालयाचे खटल्यांचे कामकाज शांततेत सुरु असताना दोन महिलांनी न्यायालयाच्या दरवाज्यासमोर उभे राहून मोठ-मोठ्या आवाजात आरडा-ओरडा करुन गोंधळ घातला असून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघींना अटक केली आहे.

देवताबाई अनिल आदमाने(वय 45),प्रियांका शंकर कसबे(वय 28 दोघी रा.कोईलनगर,कन्हेरी रोड,सोमाणी शाळेजवळ लातूर)अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.जिल्हा न्यायालय अधिक्षक विलास गुदपे यांनी फिर्याद दाखल केली ही घटना न्यायालयात दुपारी बाराच्या दरम्यान घडली.

पोलिस ठाण्यात अधिक्षक गुदपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दोन अनोळखी महिला पक्षकार यांनी न्यायालयाच्या दरवाजासमोर उभे राहून मोठ-मोठ्या आवाजात आरडाओरड केला.पोलिस कर्मचारी अतुल पाटील,शिंदे,जगताप यांचेसह इतर सर्वांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकले नाही मोठ्या प्रमाणात गोंधळ केला.

न्यायालयीन शांतता भंग केला,प्रणालीतील सुनावणीमध्ये अडथळा निर्माण केला महिला पोलिस कर्मचारी,सहायक सरकारी वकील अॅड.प्रदिप बोचरे यांनी त्यांच्या खटल्यातील माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकण्यास तयार नव्हते.

उलट जास्त प्रमाणात आरडा-ओरड करुन जमाव गोळा केला,न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणला,कामकाजावर परिणाम घडवून आणला असे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान घटनेची माहिती समजताच महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस पथक न्यायालयात उपस्थित होऊन दोघींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT