pandharpur khadde.png 
सोलापूर

चंद्रभागेच्या वाळवंटातील 'ते' धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सूरू 

अभय जोशी

पंढरपूर(सोलापूर)ः चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू चोरांकडून अहोरात्र वाळूचा उपसा सुरु असल्याने भक्तराज श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना धोका निर्माण झाला होता. या प्रकाराने वाळवंटात मोठमोठे खड्डे पडले होते. नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेच्या मदतीने हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. 

चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तराज श्री पुंडलिक मंदिरासह अनेक थोर महाराज मंडळींच्या समाध्या आहेत. वाळू चोरांकडून पूर्वी हा परिसर सोडून वाळवंटातील अन्य भागातून वाळूचा उपसा केला जात असे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून लांब अंतरावर जाऊन वाळू उपसा करण्याऐवजी श्रम वाचवण्यासाठी आता वाळू चोरांनी शहराच्या लगत असलेल्या वाऴवंटातील पुंडलिक मंदिराच्या परिसरातून वाळू उपसा सुरु केला आहे. प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे वाळवंटातील मोठ्या प्रमाणातील वाळू उपश्‍यामुळे भक्त पुंडलिकासह लगतच्या भागातील समाध्यांना धोका निर्माण झाला होता. हा परिसर वाळू चोरांनी अक्षरश पोखरुन काढला होता. 

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने वाळू उपसा थांबवावा. भक्त पुंडलिक मंदिर आणि अन्य समाध्यांचे रक्षण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उत्तम अभंगराव यांनी केली होती. दरम्यान नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी भक्त पुंडिलक मंदिर परिसराची पाहणी केली. नगरपालिकेच्या यंत्रणेच्या मदतीने वाळवंटातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे. या कामासाठी सतीश नेहतराव, मारुती संगीतराव, प्रकाश बुवा अभंगराव, सोनू अधटराव, महादेव अभंगराव, माऊली अधटराव, आनंद माने यांच्यासह होडी चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT