पंढरपूर : नामसंकीर्तन सभागृहाचे सुरू असलेले बांधकाम. (छायाचित्र ः राजकुमार घाडगे, पंढरपूर)  
सोलापूर

पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाचे काम पुन्हा सुरू 

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सुमारे 27 कोटी रुपये खर्चून नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाळण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सभागृहाचे बांधकाम सुमारे दोन महिने बंद ठेवण्यात आले होते. शासनाने मागील 3 मे रोजी बांधकामास परवानगी दिल्यानंतर सभागृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. 

हेही वाचा ः सोलापूरच्या ग्रामीण भागा कोरोना बाधितांची शंभरी
पंढरपूर शहरातील आदर्श शाळेलगतच्या पालिकेच्या प्रशस्त जागेत नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात येत आहे. सध्या शहरात एकही सुसज्ज नाट्यगृह नसल्यामुळे नामसंकीर्तन सभागृहाची निमिर्ती सुरू आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने बांधकाम थांबवल्याने हे काम अनेक महिने ठप्प झाले होते. त्यानंतर पालिकेने निविदा प्रक्रिया पुन्हा राबवून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली होती. नवीन ठेकेदारानेही सभागृहाचे बांधकाम वेगाने सुरू केले. 
मात्र, बांधकाम सुरू करून काही दिवस झाले असतानाच राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यामुळे बांधकाम पुन्हा बंद पडले. शासनाने 3 मेपासून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सभागृहाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT