Adam Dampatya 
सोलापूर

लॉकडाउनच्या विरोधात लॉकइन राहून श्रमिकांनी केला अनोखा निषेध; माजी आमदारांचाही सपत्नीक सहभाग

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन हे प्रभावी व एकमेव पर्याय किंवा उपाय असू शकत नाही. लोकांच्या आरोग्यासोबत रोजगारही महत्त्वाचा आहे. दहा दिवस शहरातील व जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या बाबत सरकार किंवा प्रशासन आपली कोणतीच भूमिका वा तरतूद केलेली दिसून येत नाही. जनतेविरुद्ध लादलेल्या या बेकायदेशी लॉकडाउनचा आम्ही निषेध करतो आहोत, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. 

शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांनी शनिवारी (ता. 18) श्री. आडम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली आपापल्या घरांसमोर सरकारचा निषेध केला. या वेळी लॉकडाउन मागे घ्या, जीवनावश्‍यक वस्तूंची भाववाढ रोखा, इंधनदरवाढ मागे घ्या, संपूर्ण लॉकडाउनच्या काळातील वीज बिल माफ करा, केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य व दरमहा साडेसात हजार रुपये आर्थिक मदत द्या, भरमसाठ बिलाची आकारणी करणाऱ्या खासगी व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या दवाखान्यांच्या व्यवस्थापनावर कारवाई करा, राज्य सरकारने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशा मागण्यांचे व निषेधाचे फलक दाखवून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. या वेळी श्री. आडम व नगरसेविका कामिनी आडम यांनी त्यांच्या निवासस्थानी निषध शासनाचा निषेध केला. या वेळी श्री. आडम यांनी, याबाबत शरद पवार यांच्या सोलापूर दोऱ्यादरम्यान भेट घेण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. 

श्री. आडम पुढे म्हणाले, बंद काळात कारखानदारांनी विडी, यंत्रमाग कामगारांना किमान दोन हजार रुपये मदत करावी, राज्य सरकारकडे 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी ही मागणी घेऊन एक लाख श्रमिकांनी अर्ज दाखल केले. याचा निर्णय घेऊन रोख अनुदान 9 ऑगस्टच्या आत अदा न केल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल. 

या शाखांमार्फत करण्यात आला निषेध 
बापूजीनगर शाखेत नरसय्या आडम, नगरसेविका कामिनी आडम, कुरमय्या म्हेत्रे, माशप्पा विटे, मोहन कोक्कुल, बालाजी म्हेत्रे यांच्यासह दत्तनगर, भगवाननगर, शहीद कुर्बान हुसेन नगर, होटगी रोड, भारत नगर, कुमठा नाका, अशोक चौक, कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत (कुंभारी अ ब क परिसर), मीनाक्षीताई साने वसाहत (कुंभारी), लष्कर, मोदी, प्रजा नाट्य मंडळ, क्रांती झोपडपट्टी, शास्त्रीनगर, डीवायएफआय शाखा, एसएफआय, इंदिरानगर, विजयपूर नाका, कोनापुरे चाळ, मित्रनगर, किसाननगर, गांधीनगर, राहुल गांधीनगर, देसाईनगर, मोदी हुडको आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT