yoga.jpg 
सोलापूर

सोलापूरमध्ये या वर्षी आयुष मंत्रालयाची प्रथमच होणार योगप्रशिक्षक परीक्षा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत होणाऱ्या योग प्रशिक्षक परीक्षांचे आयोजन यावर्षी प्रथमच सोलापूर केंद्रावर केले जाणार आहे. त्यासाठी येथील योग असोसिएशनने त्यासाठी विशेष तयारीचे नियोजन व विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. 

येथील आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जागतिक योग दिन निश्‍चित झाल्यानंतर योग जगभरातील सर्व देशात शिकविला जातो. त्यामुळे योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. शैक्षणिक संस्था, कंपन्या, कार्यालये या ठिकाणी योग शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. योग शिक्षकांचा दर्जा ठरविण्यासाठी व तो उच्च ठेवण्यासाठी प्रमाणीकरणाची गरज भासू लागली आहे. त्यासाठी योग सर्टिफिकेशन बोर्डाची स्थापना करण्यात आली. या योग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लोकांची योगप्रशिक्षक पदी नेमणूक होते. 

या परीक्षांचा दर्जा अतिशय उच्च ठेवण्यात आला आहे. हे आयोजन राष्ट्रीय स्तरावर केले जाते. यात थेअरी व प्रॅक्‍टिकल असे दोन पेपर असतात. प्रत्येक परीक्षेत किमान सत्तर टक्के गुण मिळवल्यास उत्तीर्ण ठरवला जातो. 
या परीक्षेत तीन स्तर आहेत. लेव्हल एक मध्ये योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्‍टर साठी किमान दहावी उत्तीर्ण व्यक्ती पात्र असेल. लेव्हल दोनमध्ये योगा वेलनेस इन्स्ट्रक्‍टर साठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. लेव्हल तीनमध्ये योगा टिचर अँड इव्हॅल्युएटर साठी पदवीधर पात्र असेल. परीक्षा देणाऱ्या व्यक्तीला योग शिक्षणाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. 

परीक्षेसाठी पुर्वतयारी प्रशिक्षण 
यावर्षी आयुष मंत्रालयाच्या योग परीक्षा डिसेंबर मध्ये होतील. त्यासाठी योग तज्ञांना पुरेशी तयारी करता यावी. परीक्षेची पध्दत समजून घेत थेअरी व प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यासाठी योग असोसिएशनने नियोजन केले आहे. 
- मनमोहन भुतडा, अध्यक्ष योग असोसिएशन 

शहरातील योग चळवळीला उत्तेजन 
सोलापूर शहरातील योग चळवळीला एक चांगले उत्तेजन देण्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्वाची ठरणार आहे. सोलापूरचे योग तज्ञ या परिक्षेत उत्तम पध्दतीने यशस्वी व्हावेत यासाठी प्रशिक्षणे घेतली जातील 
- व्हि.एस. गुजले, खजिनदार योग असोसिएशन  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालवाहू जहाजांना फटका! 'जेएनपीए'त अडकले एक लाखाहून अधिक कंटेनर

Buldhana News: जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी; पाणीटंचाई निवारणः १२७ उपाययोजनांना मिळाली प्रशासकीय मान्यता

Latest Marathi News Live Update : येवल्यात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त

Mumbai News: धारावीकरांसाठी दिलासादायक बातमी! कागदपत्र पडताळणी आता जागेवरच; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

राज्यात ७५०० पैकी २००० पंप बंद, तरी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,'पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका'

SCROLL FOR NEXT