Thirtyfirst 
सोलापूर

साधेपणानेच होणार थर्टिफर्स्ट सेलिब्रेशन; मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमुळे होताहेत पार्ट्यांचे प्लॅन ! 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : कोरोना विषाणूमुळे बऱ्याच वाईट घटनांचे साक्षीदार ठरलेल्या 2020 या सरत्या वर्षातील उद्या 31 डिसेंबर (गुरुवार) शेवटचा दिवस काही तासांवर येऊन ठेपला आहे. नवीन 2021 वर्षाच्या स्वागतासाठी उत्साही वातावरण मात्र दिसून येत नाही. तरी करमाळा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावपुढाऱ्यांकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी पार्ट्यांचे प्लॅन आखले जात आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी असल्याने हॉटेल, बार व रेस्टॉरंट रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतावर बंधने आली आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री बारा वाजता नववर्ष स्वागतासाठी मोठा जल्लोष असतो, मात्र या वेळी तो जल्लोष साजरा करता येणार नाही. 

दरम्यान, सोशल मीडियावरून मात्र व्हॉट्‌सऍप मेसेज, मेसेंजर, इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच इतर माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणवर्ग तयारी करीत आहे. एकूणच यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत प्रथमच अतिशय साध्या पद्धतीने होणार असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मात्र तरुण मंडळींकडून एकत्र जमून वाड्या-वस्त्यांवर, शेतात थटिफर्स्ट साजरा करण्याचे ठरत आहे. 

करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. जिल्ह्यातही बहुतांश गावांतील निवडणुका लागल्या आहेत. त्या ठिकाणच्या तरुण वर्गांचा नववर्षदिन मात्र यावर्षी उत्साहात साजरा होणार असून, प्रमुख गाव पुढारी तरुणांना आकर्षित करण्यासाठी या वर्षीचा शेवटाचा उपयोग करताना दिसून येत आहेत. 

शासनाने दिलेल्या गाइडलाइन्स तंतोतंत पाळून यंदा नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. 2020 या वर्षाने सर्वांना काही ना काही धडा दिला आहे, मात्र जुने विसरून नव्याने सुरवात करणे हे प्रत्येक समारभांचे औचित्यच असलेल्या भारतीय एकतेचे वैशिष्ट्य आहे,. म्हणून आपण आपले सगळे सण यंदाच्या वर्षी अगदी साधेपणाने साजरे केले आहेत तसेच नववर्षाचे स्वागतही साधेपणाने करून एकमेकांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देणेच उचित ठरणारे आहे. 

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कोरोना महामारीचे संकट अजूनही टळले नाही, लक्षात ठेवावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्यातच नव्या वर्षाच्या प्रारंभीच कोरोनाचा नवीन स्ट्रेन भारतात दाखल झाला असताना, नागरिक मात्र कोरोना संपल्याच्या आविर्भावात सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून वावरत आहेत. सर्व ठिकाणी गर्दी वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन पातळीवर तयारी सुरू असली तरी नागरिकांना आवरणे मात्र मोठे जिकिरीचे ठरत आहे. सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रशासनाचे सर्व नियम व अटी पाळून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

2020 वर्षाने सर्वांनाच काही ना काही धडा दिला आहे. झाले गेले विसरून पुन्हा नव्या जोमाने नवीन वर्षाची सुरवात करण्यास काही हरकत नाही. 
- अक्षय माने, केत्तूर 

नवीन वर्षाचे स्वागत करताना आवर्जून सोशल डिस्टन्सचे पालन करावे. तसेच गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना अजून संपलेला नाही याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. 
- आकाश इरावडे, केत्तूर 

कोरोना महामारीमुळे जवळजवळ संपूर्ण जग काही काळ ठप्प झाले होते. अजूनही संपूर्ण जग भीतीच्या प्रचंड सावटाखाली वावरत आहे. त्यामुळेच की काय या 2020 ला लवकर निरोप देऊन नवीन वर्षाची सर्वजण वाट पाहात आहेत. येणारे नवीन वर्ष तरी कमीत कमी नवीन आशा व आनंद घेऊन येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. 
- विकास काळे, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT