yoga useful to fight with corona 
सोलापूर

कोरोनाच्या लढ्यात योगा ठरतो मोलाचा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर ः कोरोनाच्या संकटात योगासने व प्राणायाम हे योगाचे प्रकार अत्यंत प्रभावी कामगिरी बजावतात. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हवी असलेली प्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम योगाच्या माध्यमातून करता येते.

कोरोना आजारात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोना आजाराची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरामुळे सकारात्मक मानसिकता वाढीस लागते.
या आजारात कोणतेही रामबाण औषध नसल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक्षमता हीच महत्त्वाची ठरते. शरीरात रोग प्रतिकारक्षमता ही पांढऱ्या पेशी, टी सेल यांच्या माध्यमातून होते. पांढऱ्या पेशीची निर्मिती अस्थी मज्जा (बोन मॅरो) व प्लीहा ग्रंथीत तयार होतात. टी सेल या थायमस ग्रंथीत तयार होतात. या निर्मिती केंद्राचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, पादहस्तासन, अर्धवक्रासन, धनुरासन, पवनमुक्तासन आदी आसने उपयुक्त आहेत. सूर्यभेदन व नाडीशोधन हे प्राणायामाचे प्रकार देखील प्रतिकारक्षमता वाढीला मदत करतात. शरीरात सायनसच्या बाजूला अँटीऑक्‍सिडेंटची निर्मिती होत असते. त्यासाठी ओंकार व भ्रामरी हे प्राणायाम या निर्मितीला चालना देणारे ठरतात.
कोरोनाचा विषाणू हा रुग्णांच्या श्‍वसनसंस्थेवर हल्ला चढवतो. तेव्हा श्‍वसनसंस्था सक्षम असली पाहिजे. श्‍वासमार्ग जलनेती व सूत्रनेती या शुद्धिक्रियेने सुरळीत होतात. कपालभाती व भस्त्रीका हे देखील प्राणायामाचे प्रकार आहेत. ज्या आसनामध्ये पाय वर व डोके खाली करावे लागते ती आसने केली तर श्‍वसनसंस्थेचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. उज्जायी प्राणायामाने घसा व थायरॉईड यांची ताकद वाढते. सिंहासन किंवा व्याघ्रमुद्रा ही मस्तक व ज्ञानेंद्रियांना बळकट करणारी ठरते. यौगीक आहार म्हणजे शाकाहार हा आजाराच्या काळात सुयोग्य ठरतो. या पद्धतीने कोरोनाच्या विरुद्ध लढ्यासाठी योगासनाने मिळणारी प्रतिकारक्षमता उपयुक्त ठरते. योग्य आसने व प्राणायामाच्या माध्यमातून प्रतिकारक्षमता वाढ व श्‍वसनसंस्था मजबूत करण्याने या आजाराच्या विरुध्द लढता येणे शक्‍य आहे असे ज्येष्ठ योग अभ्यासक मनमोहन भूतडा यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT