Rapelli 
सोलापूर

आदर्शवत : युवकाने दाखवलेल्या माणुसकीमुळे बेवारस आजीला मिळाली मुक्ती!

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आज रक्ताच्या नात्यांमधील आपुलकी नामशेष होतानाची अनेक उदाहरणे समोर असताना, एका युवकाने आपल्या ना नात्यातल्या ना गोत्यातल्या बेघर आजीला निवारा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर या आजीचा मृत्यू झाल्यावर तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही त्याने पार पाडली. या युवकाने दाखवलेल्या माणुसकीमुळे आज त्या आजीला मुक्ती मिळाली. 

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थ्याच्या माणुसकीमुळे एका वृद्ध अनाथ व बेघर महिलेला वृद्धाश्रमात निवारा मिळाला. त्यानंतर वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांची विचारपूस करून मदत करणारा हा युवक तेथील ज्येष्ठांचा लाडका बनला व या युवकालाही हे वृद्ध आपले घरचे वाटू लागले. मात्र ज्या आजीला त्याने वृद्धाश्रमात दाखल केले तिचे काल (शुक्रवारी) निधन झाले. अन्‌ वृद्धाश्रमाकडून या युवकाला माहिती मिळाली, तेव्हा या युवकाने आपल्या सहकाऱ्यांसह त्या आजीचे अंत्यसंस्कार केले. लहान वयात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या युवकाचे नाव आहे नीलकंठ दोरनाल. 

नीलकंठ हा सिव्हिल इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला समाजसेवेची आवड होती. शहरातील अनाथ, बेघरांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्थांना मदतही करतो. पद्मशाली इंटरनॅशनल फाउंडेशन, सोलापूर ईस्टचा सदस्य असून, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांतही सहभागी असतो. दीड-दोन वर्षापूर्वी त्याच्या मित्राकडून त्याला एका वृद्ध महिलेची माहिती मिळाली, जी बेघर होती. तिला त्या परिसरातील लोक जेवण द्यायचे, मात्र राहायला घर नसल्याने तिचे हाल होत होते. याची माहिती मिळताच नीलकंठने तिची भेट घेऊन विचारपूस केली असता तिने तिचे नाव मुक्ताबाई भांडेकर असल्याचे सांगितले. मग नीलकंठने रंगभवन तिला येथील मंगलदृष्टी वृद्धाश्रमात दाखल केले. तेथील व्यवस्थापनाला वेळोवेळी भेट देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नीलकंठ नेहमी वृद्धाश्रमाला भेट द्यायचा. वृद्धाश्रमातील इतर आजींनाही काय हवे नको पाहात होता. आता तेथील वृद्धांशी त्याचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.

कालांतराने मुक्ताबाई भांडेकर यांना स्मृतिभ्रंश झाला. मंगलदृष्टी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने याबाबत नीलकंठला कळवले. त्यानंतर नीलकंठने स्वत:च्या जबाबदारीवर मुक्ताबाईंना भोगाव येथील आधार केअर सेंटर येथे दाखल केले. सात महिन्यांनंतर आजीचे काल निधन झाले. याबाबत नीलकंठला कळविण्यात आल्यानंतर त्याने आस्था रोटी बॅंकेचे श्री. चंचुरे, हरिदास पेंटा, मधुकर रापेल्ली, दीपक बोडा, पवन कोंडी, श्रीनिवास इप्पा, गौरीशंकर दिकोंडा व मंगलदृष्टी वृद्धाश्रमाच्या रजनी भाटिया व यांच्या सहकार्याने आजीवर अंत्यसंकार केले. 

नीलकंठ दोरनाला म्हणाला, मला दीड-दोन वर्षांपूर्वी बेघर असलेल्या वृद्ध मुक्ताबाई भांडेकर आजीबद्दल माहिती मिळाली होती. मी त्यांना स्वत:च्या जबाबदारीवर मंगलदृष्टी वृद्धाश्रमात दाखल केले. वृद्धाश्रमानेही सहकार्य केले. तेथील वृद्ध आजींना नेहमी भेटत असल्याने त्यांच्याशी कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. काल मुक्ताबाई आजीचे निधन झाले. मात्र त्यांच्यावर रीतिरिवाजाप्रमाणे आमच्या ज्येष्ठांच्या सहकार्याने केवळ सातजणांच्या उपस्थित कारंबा नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT