crime.jpg
crime.jpg 
सोलापूर

तरुणांनी संशयीत व चोरांना केला पायबंद

सकाळ वृत्तसेवा

कोर्टी (सोलापूर) ः कोरोनाचा संशयीतासोबत चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी घरतवाडीच्या तरुणांनी व्हॉटसऍप ग्रुप तयार करून गावाला सुरक्षीत करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. 

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना रोजगार नाही. याकाळात चोरीच्या घटना वाढू लागल्याने घरतवाडी (ता. करमाळा) गावातील युवकांनी एकत्र येऊन गावात रात्रभर गस्त घालण्याचा निर्णय घेतला. घरतवाडी हे गाव राशीनच्या (जि.नगर) सीमेवरचे गाव आहे. गावच्या भोवती वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या भागात घरफोड्यांच्या घटना घडू लागल्या. याशिवाय विहिरीतील विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटनाही घडू लागल्या. त्यामुळे येथील अनिकेत गायकवाड यांनी गावातील तरुणांना एकत्र करत परिवर्तन पथकाची स्थापना केली. 
आठ तरुणांचे एक पथक अशी सात पथके तयार केली. प्रत्येकाजवळ बॅटरी व काठी ठेवण्यात आली. रोज रात्री 10 ते पहाटे चारपर्यंत गावात हे तरुण पहारा देत आहेत. यामुळे संशयास्पद फिरणारे लोक तसेच चोऱ्या होणे बंद झाले आहे. व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला असून ग्रुपवर गावात कोणतीही घटना घडली तर त्यांची माहिती मिळते. 
यामुळे स्थानिक गावकरी, महिलावर्ग तसेच मुलांमधील भीतीचे वातावरण नाहीसे झाले. 
परिवर्तन पथकास कोणी संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास त्यास जाब विचारून पथकाचे समाधान झाल्यास त्यास सोडून देण्यात येते. गावकरीही आनंदात असून सुखाची झोप घेत आहेत. परिवर्तन पथकाची निर्मिती केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी या कामगिरीचे कौतुक केले. इतर गावांनाही घरतवाडी पॅटर्न राबवावा, असे सूतोवाच केले आहे. 

चोर व अनोळखी व्यक्तीला पायबंद 
घरतवाडी हे गाव सीमेवरचे छोटेसे गाव आहे. येथे वारंवार चोऱ्या होण्याचा प्रकार सुरू असतो. कोरोनामुळे तर हे प्रमाण एवढे वाढले की लोक रात्ररात्र जागेच राहू लागले. 
प्रत्येक वेळी रात्री-अपरात्री पोलिस गावात येणे शक्‍य नाही म्हणून गावातील तरुणांना एकत्र करत रात्रभर पहारा देण्याचा निर्णय घेतला. याला तरुणांनी तत्काळ सहमती दिली. गेल्या महिनाभरात गावात एकही चोरी झाली नाही. 
- अनिकेत गायकवाड, घरतवाडी, ता. करमाळा 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT