सोलापूर

तरुणांना मास्क हवा, पण स्टायलीश

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा विचार करण्याबरोबर स्टायलिश मॅचिंगचा मास्क घालण्याची फॅशन तरुणाईत रुजताना दिसत आहे. रंगीबेरंगी, स्टायलिश कापडी मास्कला बाजारात मागणी वाढली असून मॅचिंगचे मास्क घेण्यासाठी तरुणाई आग्रही असल्याचे दिसते. 

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. तो न वापरल्यास प्रशासनान कारवाई करत असल्याने काळजी किंवा दंडाच्या भीतीने सर्वजण सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत आहेत. एप्रिल महिन्यात सुरवातीला बहुतांश नागरिकांनी मेडिकल दुकानातून मास्क घेतले. यावेळी सर्जिकल मास्कना मागणी होती. ग्रामीण भागात एन 95 मास्क उपलब्धच नव्हता. आताही कमी प्रमाणात उपलब्ध असून त्याची किंमत परवडत नाही. 

त्यामुळे बाजारात अनेक दुकानांत कापडी मास्क विक्रीस आले. यामुळे घरात काम करणाऱ्या आणि बचत गटातील महिलांना मास्क शिवण्याचे मोठे काम मिळाले. त्यातून अर्थार्जनासाठी मदत झाली. त्यात अनेकांनी डिझाईन, रंग, वेगवेगळे इलॅस्टिक, लेसचा वापर करून आकर्षक मास्क तयार केले. त्यांना सध्या मागणी वाढली आहे.

मास्कची किंमत 15 ते 200 रुपयांपर्यंत आहे. त्यात दोन, तीन लेअर, कानाला इलॅस्टिक पट्टी लावता येणारे, डोक्‍याला बंदने बांधता येणारे, हवा खेळती राहणारे, प्लास्टिक टोपण असलेले मास्क विक्रीस आले. ऑपरेशन थिएटरमध्ये असलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाचे मास्क बहुतांश नागरिक घालताना दिसत आहेत. अनेक तरुण आपल्याला चांगला दिसणारा मास्क घेत असल्याने आकर्षक मास्कना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र


आधी सुरक्षिततेचा विचार करून चांगल्या प्रतीचे मास्क घेताना स्टायलिश, मॅचिंग होणारा मास्क घेतला तर सुरक्षितता व फॅशन दोन्ही साध्य होते. 
- ओम परबत, 
तरुण, कुर्डुवाडी 

रंगीत कापडी मास्कना खूप मागणी आहे. अनेक तरुण-तरुणी वेगवेगळ्या रंगाचे पाच-सहा मास्क घेऊन जातात. 
- विजय दीक्षित, 
विक्रेता, कुर्डुवाडी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT