soldiers Missing from Belgaum Maratha Light Infantry.gif 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावातून मराठा लाईट इन्फंट्रीतील जवान बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीतील (एमएलआयआरसी) नाईक पदावर कार्यरत असलेला जवान बेपत्ता झाल्याची फिर्याद शुक्रवार (ता.3) कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.संदीप सुपाड पाटील (वय 32, मुळ रा. घर नंबर 72 पोस्ट कार्यालयानजिक कर्देकुर्दे ता. नंदुरबार राज्य महाराष्ट्र सध्या रा. नानावाडी बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

हे पण वाचा- देशात राहायचे असेल तर आमचे ऐका

पत्नी दिपीका यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती संदीप हे एमएलआयरसीमध्ये नाईक पदावर कार्यरत असून त्याने गेल्या तीन महिन्यापासून खर्चाला पैसेच दिले नव्हते. त्यामुळे एटीएम कार्ड किंवा जॉइंट अकाउंटतरी काढून द्या म्हणून आपण त्यांच्याकडे तगादा लावला होता. पण, अद्यापही अकाउंट किंवा एटीएम काढून देण्यात आलेले नाही. यावरुच मंगळवार (ता.31) रात्री दोघामध्ये भांडण झाले. गुरुवारी (ता.2) दुपारी 2.30 च्या सुमारास संदीप एमएलआयरसीमध्ये जाउन येतो असे सांगून (दुचाकी क्रमांक एमएच 39 के 5914 )रागाने निघून गेले होते. ते अद्याप परतले नसल्याने सर्वत्र शोध घेउन अखेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. संदीप अंगाने सदृढ, गोल चेहरा, वर्ण गव्हाळी, डोकीवर काळेकेस असून 5.7 इंची उंची आहे. त्यांनी लाईट पिंक कलर शर्ट आणि कॉफी रंगाची पॅंट परिधान केली आहे. वरील वर्णनातील जवानाबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कॅम्प पोलीस ठाणे 08312405234 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala News: मिसिंग लिंक एक्सप्रेसवे एकत्र येतात तिथं दोन ट्रक अन् कंटेनरचा अपघात; तिघांचा मृत्यू, बोरघाटात वाहतूक कोंडी

मी दारू पित नाही पण मित्रांसोबत बाहेर गेल्यावर मात्र... तेजश्री प्रधानचं बोलणं ऐकून चाहते चकीत, म्हणते-

मी आहे ना? घाबरू नको! टीसी मागायला आलेल्या विद्यार्थीनीचा शिक्षकाने पकडला हात, जवळ घेत म्हणाला.... ; औरंगाबादमधील प्रकार

Kabira Khadi Brand: खादीचं मॉडर्न रूप पाहिलंत का? बेडशीट, जॅकेट्स, शॉलपासून ब्लँकेटपर्यंत ‘कबीरा’ ब्रँडची धूम

अदानींविरुद्धचा खटला मिटणार, अमेरिकन सरकारशी तडजोड; १,७२,७८,२०,००० रुपये दंड भरणार

SCROLL FOR NEXT