congress
congress 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची "भाऊगर्दी' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कोण असणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्‍चित होणार असले तरी, यंदा इच्छुकांची भाऊगर्दी होण्याचे संकेत कॉंग्रेसच्या गोटातून मिळत आहेत. विशेषतः शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आजपासून तेराव्या दिवशी (23 मे) निकाल लागणार आहे, त्यात कॉंग्रेसला मिळणाऱ्या यशापयशावर विधानसभा निवडणुकीची धोरणे ठरणार आहेत. 
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित आहे. सद्यस्थितीत कॉंग्रेसकडे पाच आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर हे मतदारसंघ कॉंग्रेसकडे, तर मोहोळ (राखीव) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. माढा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. सध्या कॉंग्रेसचे तीन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार आहेत. 

सोलापूर शहर उत्तर आणि  शहर मध्य या मतदारसंघासाठी रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. शहर उत्तरसाठी माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांच्यासह शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रदेश प्रतिनिधी राजन कामत, यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते इच्छुक आहेत. मध्यसाठी आमदार शिंदे यांचे नाव जवळपास निश्‍चित असले तरी, सर्वसाधारण जागेवर राखीव प्रवर्गातील उमेदवार कशाला, असा सूर निघत आहे. या जागेसाठी माजी महापौर यू. एन. बेरिया, नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्याकडून दावा केला जाण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतांचे प्रमाण पाहता ते दावा करतील, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शहर उत्तरसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आग्रह सुरू आहे. जागा वाटपात फेरबदल झाला तर, "शहर उत्तर"च्या मोबदल्यात राष्ट्रवादीकडून मोहोळ घ्यायचे आणि त्या ठिकाणी आमदार शिंदे यांना उमेदवारी द्यायची, असा प्रस्ताव इच्छुकांतून येत आहे. 

पंढरपूर मतदारसंघात भारत भालके यांचे नाव जवळपास निश्‍चित आहे. मात्र, 25 मे नंतर मोठा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने ते भाजपत प्रवेश करणार का, या चर्चेला ऊत आला आहे. तसे झाल्यास या मतदारसंघासाठी कॉंग्रेसला उमेदवार शोधावा लागणार आहे.

अक्कलकोटसाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हेच प्रमुख दावेदार असतील, तर दक्षिण सोलापूरसाठी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह राजशेखर शिवदारे यांचेही नाव चर्चेत येऊ शकते. एकंदरीतच विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरवात केली असली तरी, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच खूप काही अवलंबून असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT