grapes 
पश्चिम महाराष्ट्र

सोनी परिसरातून द्राक्षाची पाचशे कंटेनर निर्यात अपेक्षीत 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सोनी परिसरातून शंभर कंटेनरवरुन पाचशे कंटेनर द्राक्ष निर्यात व्हावी, अशी अपेक्षा विभागीय कृषी सह संचालक दशतथ तांभाळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले," शेतकरी उत्पादक गट कंपनी कायद्याखाली तयार केल्यास शासकीय अनुदान मिळेल. मात्र, त्यासाठी कंपनी चालकांवर विश्‍वास आणि चालकांकडूनही पारदर्शी कारभार आवश्‍यक आहे.' 


सोनी ( ता. मिरज) येथे मिरज तालुका कृषी विभाग व द्राक्षायणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी मेळाव्यात श्री. तांभाळे ऑनलाईन बोलत होते. सांगली बाजार समिती सभापती दिनकर पाटील, सरपंच राजेंद्र माळी उपस्थित होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आत्माचे सुरेश मगदूम, उपविभागीय कृषी अधिकारी हणमंतराव इंगवले, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी मनोगते व्यक्त केली. 


श्री. तांभाळे म्हणाले, सहकार कायद्यात संचालकांची मनमानीच्या तक्रारी आहेत. मात्र कंपनी कायद्यात सर्वांना समान अधिकार असतात. तरीही यासाठी कंपनी चालवणाऱ्यांवर सभासदांनी विश्‍वास दाखवलाच पाहिजे. त्यांच्याकडून पारदर्शी कारभार केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात चांगले दिवस येतील. सरकार यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान न देता एकत्रित गटांना अनुदान देण्याचेच धोरण आहे. यामुळे आता गट, समुह शेतीला अन्यन्यसाधारण महत्व आहे. सोनीतून गत वर्षी 80 कंटेनर निर्यात झाली होती. ती यंदा 500 वर पोहोचली पाहिजे.' 


जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मास्तोळी यांनी गट शेती, नोंदणी, कार्य याबद्दल तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. गट शेतीसाठी सरकार कोट्यवधी निधी देतेय. मात्र याचा फायदा शेतकरी गट घेण्यास धजावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गटांनी एक पाऊल पुढे यावे आम्हीही दोन पाले पुढे येवून कृषी विभाग मदतीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. बाजार समिती सभापती श्री. पाटील, प्रगतशिल द्राक्ष शेतकरी रवीराज माळी यांन मनोगत व्यक्त केले. द्राक्षायणी गटाचे अध्यक्ष रंगराव जाधव यांनी गट स्थापनेचा इतिहास आणि भविष्यातील उद्देश स्पष्ट केला. डॉ. प्रा. उल्हास माळकर यांनी प्रास्ताविकात पंचक्राशीची इतिहास सांगितला. सतिश जाधव यांनी सूत्रसंचलन केले. सोसायटीचे अध्यक्ष संजय माने, उपसरपंच श्रीकांत जाधव, करोलीचे अभिमन्यू पाटील, पाटगावचे वसंत चव्हाण उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates : तेज प्रतापही पराभवाच्या जवळ, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

PAK vs SL: म्हणे श्रीलंकेच्या खेळाडूंना देणार राष्ट्रपतींची सुरक्षा! पाकिस्तान हट्ट सोडायला तयार नाही, कंबर कसली...

Motorola Discount : मोटोरोलाचा ब्रँड 5G मोबाईल चक्क 3 हजारात; कुठं सुरुय ही 50% डिस्काउंट ऑफर? पाहा एका क्लिकवर

Al Falah University Notice: ‘अल फलाह’ विद्यापीठाला ‘नॅक’ची नोटीस; आर्थिक स्रोतांचीही चौकशी होणार, संकेतस्थळ पडले बंद

Dharmendra : धर्मेंद्र यांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला झाली अटक

SCROLL FOR NEXT