Special campaign to bring migrant children into the school stream sangli education marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष  मोहीम ; 40 सनियंत्रक अधिकारी नियुक्त

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात 6 ते 18 वयोगटांतील शालाबाह्य बालकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. दहा दिवस हा सर्व्हे करण्यात येणार आहे. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम महापालिका क्षेत्रात व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 


आयुक्त कापडणीस म्हणाले,"कोविड -19 च्या महामारीमुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे नियमित शिक्षणातील बालकांना खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ही बालके शालाबाह्य होऊ नयेत आणि विशेषत: या परिस्थितीत दिव्यांग मुलांबाबतची आव्हाने अधिक वाढू नयेत यासाठी 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करणे ही सर्वोच्च प्राधान्याची गरज आहे. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे महापालिका क्षेत्रात शोध मोहीम सुरू आहे. 

या सर्वेक्षणात महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी दोन असे एकूण 40 नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेने शाळा परिसरात आणि वॉर्डातील नेमून देण्यात आलेल्या व्यक्तीने भागातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे. एकही बालक आपल्या परिसरामध्ये शालाबाह्य राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
या मोहिमेस सर्व नागरिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रकारे माहिती देऊन कुटुंबप्रमुखाचे नांव व शालाबाह्य बालक असल्यास त्याची सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन शोध मोहीम समितीचे अध्यक्ष आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील व सदस्य सचिव प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी केले आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत Gen Z ची एन्ट्री! नव्या विचारांची लाट येणार; मतदारांचा कल बदलणार का?

अजय अतुल यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आणि... असं तयार झालं 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' गाणं

Scorpio Horoscope 2026 : वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसं असेल, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करा...

Indian Army SSC Tech 2026 : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! कोणतीच परीक्षा नाही, कशी होणार निवड? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates Live: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शोचे आयोजन

SCROLL FOR NEXT