Statue of Rajarambapu to be installed; Resolution in Walava panchayat samiti meeting 
पश्चिम महाराष्ट्र

लोकनेते राजारामबापूंचा पुतळा बसविणार पुतळा; वाळवा पं.स. सभेत ठराव

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा पंचायत समितीच्या आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पुतळा बसविण्याचा ठराव आज सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेत पेठ मधील ग्रामसेवक करभरणा कामात कसूर करत असल्याची तक्रार झाली. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. 

सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजी पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहा. गटविकास अधिकारी अजिंक्‍य कुंभार यांच्या उपस्थितीत सभा झाली. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विजयसिंह जाधव प्रमुख उपस्थित होते. विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी पेठ ग्रामसेवकाची तक्रार केली. ग्रामपंचायत विषयात राहुल महाडीक आक्रमक झाले. त्यांनी पेठ व अहिरवाडी या गावातील मांडलेल्या विषयावर राहुल महाडीक आक्रमक झाले. पेठ येथील ग्रामसेवक यांच्या हात शिल्लकीवरुन पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यात मतभेद आहेत, यामुळे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात दुरावा निर्माण होत आहे. 

तालुक्‍यातील अनेक गावात हा विषय असल्याचे ते म्हणाले. तसेच अहिरवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवका कडून ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ झाले असून वारंवार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे तक्रार करूनही निर्णय नसल्याची तक्रार केली. 

कोरोना विषाणूचे वाळवा तालुक्‍यात एकूण 51 रुग्ण आहेत, पैकी ऍक्‍टिव्ह 6 आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांसाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले. बांधकाम विभागाकडून जी कामे झाली आहेत त्याचा तपासणी अहवाल द्यावा, अशी मागणी शंकर चव्हाणनी केली. तालुका कृषी प्रशासनाकडून गतवर्षीच्या महापूरग्रस्तांना 32 कोटी आले होते, ते वर्ग केल्याचे सांगण्यात आले. वेगवेगळ्या स्तरावर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी आहे. गेल्या महिन्यात एकही पेशंट नाही अशाच ठिकाणी शाळा सुरू करता येतील, शाळा व्यवस्थापन समितीचे त्यावर नियंत्रण राहील. जोपर्यत विद्यार्थी शाळेत येत नाही तोवर ऑनलाइन शिक्षण द्यावे, विद्यार्थी शाळेत येताना मेडिकल सर्टिफिकेट महत्वाचे आहे, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडे रिक्त पदे जास्त असल्याने कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. जागा भरण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान आलेले नाही, अशी खंत अधिकाऱ्यांनी मांडली. 

कारवाईचे काय? - राहुल महाडिक 
ग्रामपंचायतकडून नियोजित आराखड्याप्रमाणे कामे होत नसल्याची तक्रार शंकर चव्हाणनी केली. महाडिक यांनी पेठ, अहिरवाडी ग्रामपंचायतीचा विषय मांडला. संबंधितांकडून खुलासा मागविला आहे, त्यानंतर कारवाई करू, दोषी आढळल्यास निलंबित करू असे आश्वासन शशिकांत शिंदे यांनी दिले. यापूर्वी ज्या ग्रामपंचायतींच्या चौकशा सुरू केल्या आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली ते सांगा असे राहुल महाडिक म्हणाले. 

पूरग्रस्त पडझडीच्या मदतीत मोठा घोटाळा 
राहुल महाडीक व विजय खरात यांनी महापुरात झालेल्या पडझडीमध्ये मिळालेल्या शासकीय मदतीमध्ये मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे, तालुक्‍यातील गावांचा सर्वे करून मदतीपासून कोण वंचीत राहिला आहे व शासनाची फसवणूक करून कोणी मदत मिळवलेली आहे याची दहा दिवसात माहिती देण्याची मागणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT