jayant patil meeting.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर शहर निर्जंतुकीकरण करा : जयंत पाटील 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) - वाळवा व शिराळा तालुक्‍यातील कोणीही बेघर, मोलमजुरी करणारी व्यक्ती उपाशी राहणार नाही. ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यक्तीना तातडीने अन्नधान्य पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. तीन ठिकाणी शिवभोजनाची सुरवात करा. इस्लामपूर शहराचे तातडीने निर्जंतुकीकरण करा. शहरातील सर्व खासगी दवाखाने व मेडिकल बंद राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. 


कोरोनाबाधीत परिस्थितीचा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार प्रमुख उपस्थित होते. 
मंत्री पाटील म्हणाले, "वाळवा व शिराळा तालुक्‍यातील आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या दक्षता घाव्यात. इस्लामपूर शहरात कोरोनाने बाधीत झालेल्या कुटुंबाच्या संपर्कात कोणी आले आहे का ? याची शहानिशा करावी. आवश्‍यक असणाऱ्याना होम कोरंटाईन करावे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती कामात अडथळा निर्माण करू नका. मळणी मशीन, ट्रॅक्‍टरसाठी डिझेल पुरवठा करावा. 
पोलिसांनी अनावश्‍यक मारहाण करू नये. नागरिकांनी अत्यावश्‍यक सेवेशिवाय घरातून बाहेर पडू नये.

इस्लामपूर, शिराळा, आष्टा येथे शिवभोजनाची सुरवात करून गरजूंना जेवण उपलब्ध करुन द्यावे. महामार्गावर लोक चालत जात आहेत. त्यांना काय सुविधा उपलब्ध करून देता येतील का ? याबाबत विचारणा झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही आज कवठेमहांकाळ, जत परिसरात नागरिक मजूर स्थलांतर करण्यासाठी चालत आले आहेत. त्यांच्यावर संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी लक्ष ठेवत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक संजय कोरे, चिमन डांगे, खंडेराव जाधव, शहाजी पाटील यांनी इस्लामपूर शहराच्या विविध प्रश्नांबाबत सूचना मांडल्या. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. अशोक शेंडे यांनी तालुक्‍यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. 

नगराध्यक्ष बैठकीला नव्हते! 
कोरोनाबधित शहर म्हणून इस्लामपूर संवेदनशील बनलेले असताना या आढावा बैठकीला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT