पश्चिम महाराष्ट्र

तेरी मेहरबानियॉं तेरी कदरदानिया! हिंगणगावचा 'रॉकी' वेधतोय लक्ष

रॉकी मालकासोबत शेतात ठिबक अंथरण्याच्या कामात मदत करतोय

सकाळ डिजिटल टीम

सांगली : घराची राखण, इमानदारी, प्रेम, प्रामाणिकपणा ही सारी पाळीव कुत्र्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. कुत्रा म्हंटल की, पायात लोळण घेणं, धन्याचं ऐकणं, त्याच्या पाठीमागून फिरणं, शेताची (farming work) राखण करणं या साऱ्या गोष्टी आल्याच. जनावरांसोबत राहून त्यांच रक्षण करणं, शेतीची राखणं करत कामात खारीचा वाटा उचलणं हे याचं महत्वाचं काम. 'हॉलिडे' (holiday) किंवा 'हम आपके हें कौन' अशा अनेक चित्रपटांतूनही कुत्र्याचा इमानदारी आणि प्रामाणिकपणावर काही प्रसंग दाखवले आहेत.

आजची स्टोरी आहे, अशाच एका प्रामाणिक आणि अॅक्टीव्ह (डॉग) कुत्र्याची म्हणजेच रॉकीची. सांगलीतील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक या गावात असाच 4 महिन्याचा एक कुत्रा आहे. त्याच नाव आहे रॉकी. ज्यानं परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालकाचा कोणताच शब्द खाली पडू न देणारा लाडका रॉकी. हिंगणगाव बुद्रुकातील हणमंत कदम हे रिटायर्ड फौजी आहेत. सध्या ते शेती करतात. मात्र शेतीच्या प्रत्येक कामात रॉकी त्यांची मदत करताना दिसतोय. घराच्या राखणीसोबत लॉकडाऊन काळात मुलांचा सवंगडी बनलेला रॉकी अवघ्या 4 महिन्याचा आहे. तो शेतात ठिबक अंथरण्याच्या कामात मदत करतोय. तोंडात ठिबकची पाईप धरुन तो धावतोय. त्यामुळे वेळेची बचतही होतेय. शिवाय मालकाचे श्रमही वाचवण्याच काम तो करत आहे.

कोणतही काम तो चटकन करतोय. एरव्ही जितक्या जलद गतीने कामगार काम करत नाहीत तितक्या तत्परतेने रॉकी ते काम करत आहे. क्रिकेट खेळताना लांब मारलेला बॉल तो आणून देतो. मालकासोबत 24 तास तो शेतात असतो. शेतातील कोणतही काम सांगितलं चटकन करतो. असा ही सर्वांचा लाडका रॉकी शेतात राबताना दिसतोय. सध्या हणमंत कदम शेतात ठिबक पाइप अंथरण्याचे काम करत आहेत. परंतु त्यांनी आदेश देताच पाइप तोंडात धरुन रॉकी बरोबर एका रेषेत धावत शेवटच्या टोकापर्यंत ठिबक पाईप नेऊन सोडतोय. पुन्हा पाईप नेण्यासाठी त्याच वेगान रिटर्न पळतही येतोय. त्याच्या या गुणाने त्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलयं. रॉकी हा गुणी कुत्रा आहे. शिवाय आमच्या कुटूंबातील तो एक महत्वाचा सदस्यही असल्याचे हनमंत कदम आणि कुटुंबियांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT