story of two girls in sangli shirol posting in army force success story
story of two girls in sangli shirol posting in army force success story 
पश्चिम महाराष्ट्र

मुली म्हणून बापाने नाकारलं, आईच्या आधाराने देशसेवेसाठी झाल्या सज्ज

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली) : मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा, मुलगी म्हणजे आशेचा किरण, मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी. असं बरचं काही मुलींना अगदी तंतोतंत लागू पडतं. मग मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं मानलं जातं. पण हा वंशाचा दिवा अखंड तेवत ठेवायचा असेल तर वात म्हणून एक मुलगी हवीच असते. ज्या मुलीला समाज परक्याचं धन समजतो ती असल्याशिवाय कोणाच्याही आयुष्यात श्रीमंती येत नाही असं अनेकजण म्हणतात ते खरंही आहे. पण हे धन ज्याच्याजवळ असते अशा अनेकांना त्याची किंमत नसते. ज्याला या धनाचे खरे मोल कळते, त्यांना ती अभिमानाती बाब वाटते.

अशाचं एका माऊलीने पोटच्या पोरींसाठी रात्रंदिवस काबाडकष्ट केले. बापाने नाकारलेल्या या बहिणींच्या जोडीचा प्रवास  प्रेरणादायी आहे. एका क्षणात आईच्या कष्टाच पोरींनी चीज करुन दाखवलं आहे. बापाने नाकारलेल्या मुलींना आईने काळजाला कवटाळून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. आज त्याच पोरींनी समाजासमोर एक आयडॉल म्हणून छाप उमटवली आहे. असा प्रेरणादायी संदेश पोहचवणाऱ्या दोन बहिणींच्या यशाची कहाणी...

शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक पण सध्या लाडवाडी (येळापूर) येथे आईच्या मामाच्या गावी राहणाऱ्या पूजा आणि रोहिणी या दोघी बहिणी. प्रचंड जिद्दी आणि कष्टाळू. त्यांचे वडिल वाकुर्डेचे रहिवासी. पण त्यांना मुलगा हवा होता. नशिबाने त्यांना एका पाठोपाठ एक अशा दोन मुली दिल्या. यावरुन त्यांच्या संसाराला वादाची वाळवी लागायला सुरुवात झाली. सततच्या त्रासाला कंटाळून आई छायाने आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आपल्या मामांचे गाठले. 

आपल्या मुलींसह आपला त्रास मामाला नको म्हणून घरोघरी, बाजारात जाऊन चणे, फुटाणे, मुरमुरे विकण्याचे काम त्यांनी सुरु केले. आपल्या शिक्षणासाठी, जगण्यासाठी आहोरात्र राबणाऱ्या आईचे विदारक चित्र दोघी बहिणींना डोळयांसमोर कायम दिसत होते. छाया स्वतः अल्पशिक्षित असल्या तरी आपल्या मुलींनी खूप शिकावे म्हणून त्यांची धडपड सुरू होती.

हे कष्ट आणि आईची होणारी फरपट पाहून दोघींनी विचार केला. आपल्याला कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. जे काय करायचे ते स्वबळावर आणि अफाट कष्टावर. असा ठाम निर्धार मनाशी बाळगुण त्यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. दोघी पठ्ठ्या शाळेच्या अभ्यासात तर हुशार होत्याच, शिवाय खेळ, स्पर्धा यातही मातब्बर. दहावीला पुजाने ९३% तर रोहिणीने हिला ७२% गुण मिळवले. 

शालेय शिक्षण घेत असताना काहीतरी भन्नाट करावं या जिद्दीनं त्यांनी आर्मी भरतीची तयारी सुरु केली. या विचारानं भेभान झालेल्या दोघींनी त्यासाठी हालचाली सुरु केल्या. भरतीसाठी सरावाला त्यांनी गावच्या माळाला प्रशिक्षण केंद्र केले. तिथेच सरावाला सुरूवात केली. त्यांचे प्रयत्न इतके प्रामाणिक होते की पहिल्याच प्रयत्नांत एकाचवेळी पुजाची  बी. एस. एफ. मध्ये तर रोहिणीची आसाम रायफल्समध्ये निवड झाली. दोघींनी पाहिलेली मोठी स्वप्नं आईच्या आशीर्वादाने आणि स्वत:च्या कष्टाने पूर्णत्वाला गेली. 

कोणती ही खासगी शिकवणी किंवा प्रशिक्षण न घेता मेहनतीने स्वबळावर मिळवलेल्या या यशास्वी बहिणींची आज अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे. त्यांना आई, मामा -मामी, फौजी विष्णु गायकवाड, संतोष गायकवाड, सागर माने, सत्यजीत गायकवाड, सागर गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्या सांगतात.

संपादन - स्नेहल कदम    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT