The stray dog ​​fled her baby
The stray dog ​​fled her baby 
पश्चिम महाराष्ट्र

भटक्या कुत्र्याने पळवले तिचे बाळ... मग ती का धावली नाही

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः आपल्या उपयोगाची नसलेली कोणतीही वस्तू फेकून दिली. हे माणसांच्या बाबतीत लागू होत नाही, असं म्हणणं आता धाडसाचं ठरणार आहे. नकोशी असलेली माणसंही उघड्यावर फेकली जातात. हे बऱ्याचदा कानावर येतं. संगमनेर तालुक्‍याची प्रचिती आली. 

निमगाव जाळी शिवारात काय घडलं

कोल्हार-घोटी राज्यमार्गावर निमगाव जाळी शिवारात भटक्‍या कुत्र्याच्या तोंडात अर्भक असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. ते चार-पाच दिवसांचे अर्भक असावे. कोल्हार-घोटी राज्यमार्गाच्या कडेला असलेल्या हरीबाबा मंदिरालगतच्या उसाच्या शेतात हा प्रकार उजेडात आला.

दुपारी बाराच्या सुमारास भटक्‍या कुत्र्याला पाहून ग्रामस्थ हादरले. त्याच्या तोंडात नवजात अर्भक होते. अर्भक घेऊन कुत्रे पळत होते. त्या पळणाऱ्या कुत्र्याचा लोकांनी पाठलाग केला. तेव्हा हॉटेलमागे संपत खरात यांच्या शेतात ते अर्भक टाकून कुत्रे पसार झाले.

ग्रामस्थांनी केली सुटका 

ग्रामस्थांनी पाहणी केली. परंतु काही माहिती मिळाली नाही. ते अर्भक मृत होते की जिवंत होते. जर दगावले असेल तर कशामुळे? मग त्याचा अंत्यसंस्कार योग्यरितीने का केले नाही? का ते बाळ नकोसे होते. याचा उलगडा झाला नाही.

ग्रामस्थांनी पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांना माहिती दिली. त्यांनी आश्वी पोलिसांना कळविल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी आले. सहायक फौजदार संजय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT