Prakash-Javadekar
Prakash-Javadekar 
पश्चिम महाराष्ट्र

संशोधन केंद्रातून नवउद्योजकांना बळ

सकाळवृत्तसेवा

सातारा - विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना चालना देत त्यांनी केलेल्या संशोधनाला मूर्तरूप देण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रामुळे नवउद्योजक निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.

रयत शिक्षण संस्थेची गोल्डन ज्युबिली इमारत व यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन ॲण्ड इन्क्‍युबेशन (सीआयआयआय) या प्रकल्पाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार होते. कार्यक्रमास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार विश्‍वजित कदम, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. टाटा टेक्‍नॉलॉजी, सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी पार्क (पुणे) व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यमाने ‘सीआयआयआय’ या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन उत्पादन व सर्जनशील निर्मितीसाठी इनोव्हेटर्सना मदत करणे, नवीन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे, उच्च प्रतीचे औद्योगिक प्रशिक्षण पुरविणे, तरुण उद्योजकांना स्टार्टअपसाठी को-वर्किंग स्पेस उपलब्ध करून देणे, नवीन उत्पादन, सेवा व प्रक्रिया बाजारपेठेत आणू इच्छिणाऱ्यांसाठी मेन्टॉरशिप पुरविणे, पेटंट, कॉपी राईट्‌स, डिझाईन रजिस्ट्रेशन व त्याचे व्यावसायिकरण करणे, यासाठी पाठबळ पुरविणे अशा विविध उद्देशाने हे केंद्र काम करणार आहे. 

नवीन उत्पादनाचा आराखडा विकसित करणे, मूलभूत नमुन्याची उभारणी करणे, उद्योग आराखडा उभारणी, व्यावसायिक संधीची निर्मिती आदींच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी सांगितले.

रयत सेवकांसह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव वर्षाला आजपासून सुरवात झाली. त्यानिमित्ताने रयत सेवक व विद्यार्थ्यांनी चित्ररथासह शहरातून प्रभातफेरी काढली. श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गवत कापणी यंत्र तयार केले आहे. उंब्रजच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुउद्देशीय कृषी औजार तयार केले आहे. श्री. जावडेकर व श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी या विद्यार्थ्यांच्या स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT