The Subject Committee not selected again fourth time 
पश्चिम महाराष्ट्र

विषय समितींच्या निवडी "या' कारणामुळे चौथ्यांदा लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : सलग तीन वर्षे निवड रद्द झाल्यानंतर येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी गटनेत्याअभावी आजही चौथ्यांदा होऊ शकल्या नाहीत. सत्ताधारी गटाने 25 नगरसेवकांची यादी दिल्यानंतरही गटनेताच नसल्याने यंदाही निवडी झाल्या नाहीत. 

पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विषय समिती सदस्य निवडीसाठी बैठक झाली. सत्ताधारी महाआघाडीने नगरसेवक राजेंद्र पवार यांनी 10, तर कॉंग्रेसच्या एका गटाचे सुभाष ऊर्फ बाळासाहेब गांगड यांनी 15 सदस्यांची यादी सादर केली होती. विरोधी कॉंग्रेसच्या एका गटाचे संजय फंड व भाजपच्या भारती कांबळे यांनी गटनेतेपदाचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने निवडीचा कार्यक्रम स्थगित ठेवावा, असे स्वतंत्र अर्ज सादर केले. 

गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट 

गटनेत्याने सदस्यांची यादी सादर केल्यानंतर, सदस्यसंख्येनुसार सभापती व सदस्यांची निवड होते; परंतु गटनेत्याची नोंदणी नसल्याने, तसेच गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने समित्यांची निवड होऊ शकत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. विषय समित्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नगरसेवकांची बैठक घेऊन समेट घडवून आणला होता. 

सत्ताधारी गटाचा हिरमोड 

सत्ताधारी गटाकडे 25 सदस्यसंख्या झाल्याने, विनासायास निवडी होतील, असे चित्र होते. मात्र, गटनेता म्हणून नोंद नसल्याने निवडी होऊ शकत नसल्याचे सांगत पीठासीन अधिकारी पवार यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी गटाचा हिरमोड झाला. या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटाकडून कायदेशीर बाबींची पडताळणी करून निर्णय घेणार असल्याचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी सांगितले. 

फुटीर सदस्यांना सभापतिपदाची स्वप्ने

पालिका विषय समित्यांची ही निवडणूक नसून, निवडीचा कार्यक्रम आहे. दोन दिवसांपासून सत्ताधारी आदिक व कॉंग्रेसच्या फुटीर सदस्यांना सभापतिपदाची स्वप्ने पडत होती; परंतु पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. काही स्वार्थी लोकांनी वेगळी चूल मांडत सत्ताधाऱ्यांना साथ दिली. लोकसभा, विधानसभेनंतर त्यांच्यासह आदिक गटाला हा तिसरा धक्का आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विखे यांचा या निवडीशी संबंध नाही. 
- करण ससाणे, उपनगराध्यक्ष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT