पश्चिम महाराष्ट्र

Video : तगमग वीस तासांची; आता बाळ ठणठणीत

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः कोरेगाव व साताऱ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या योग्य निदानामुळे अवघ्या 20 तासांत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाल्याने कोरेगाव येथील नवजात बालकाला जीवदान मिळाले. याबाबतची माहिती संबंधित मुलाच्या पालकांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
याबाबत बाळाचे वडील कोरेगाव येथील सागर धोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी प्रियांका धोत्रे यांची प्रसूती कोरेगाव येथील डॉ. चारू शहा यांच्या रुग्णालयात झाली. नवजात बालक हे काळेनिळे पडलेले होते. प्राथमिक तपासणीत डॉ. शहा यांना बाळाला हृदयाचा गंभीर आजार असेल, असे वाटले नाही. परंतु, काही वेळानंतर त्यांनी पुन्हा बाळाची तपासणी केली. त्या वेळी बाळाला गुंतागुंतीचा आजार असल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने निर्णय घेत बाळाला येथील चिरायू रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.
 
चिरायू रुग्णालयात बाळाला दाखल केल्यानंतर रुग्णालयातील यंत्रणेने लगेच डॉ. भास्कर यादव यांना कोरेगावातून एक बाळ दाखल झाल्याचे सांगितले. त्यांनी रुग्णालयात येवून बाळाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या रक्तवाहिन्या उलटसुलट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाळाची तपासणी केल्यानंतर त्याला हृदयाचा आजार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या आजारामध्ये कोणताही उपचार उपयुक्त ठरत नाही, बाळ लगेच दगावते, अशी परिस्थिती असते. त्यासाठी बाळाची शस्त्रक्रिया करणे हा एकच उपाय असतो. त्यामुळे डॉ. यादव यांनी बाळाच्या नातेवाईकांना विश्‍वात घेत बाळाला असलेल्या आजाराची माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानंतर बाळाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रियेला संमती दिली.

 Women's Day : चिलीपिली जगवली...देशसेवेसाठी अर्पिली...

नवजात बाळावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकीळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात होतात. डॉ. यादव यांनी त्यांना तेथे जाण्याचा सल्ला दिला. तसेच याबाबतची कल्पना त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही पूर्वनियोजित शस्त्रक्रिया बाजूला ठेवून या बाळावर तातडीने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. कोरेगाव व साताऱ्यातील डॉक्‍टरांचे योग्य निदान व सल्ल्यामुळे या बाळावर अवघ्या 20 तासांत यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाले. डॉ. चारू शहा, डॉ. भास्कर यादव, डॉ. नितीन ओंबासे, मुंबई येथील डॉ. कुलकर्णी व डॉ. सुपेकर यांच्या प्रयत्नांमुळेच आज आमचे बाळ ठणठणीत असल्याचे वडील सागर व आई प्रियांका धोत्रे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT