Sugar esakal
पश्चिम महाराष्ट्र

Karnataka Sugar Production: साखर उत्पादनात बेळगाव जिल्हा अव्वल

जिल्ह्यात २६ साखर कारखान्यांत १.३४ कोटी मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून, १३.२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यात २६ साखर कारखान्यांत १.३४ कोटी मेट्रीक टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) झाले असून, १३.२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कोरोनाचे भीषण संकट, हवामान बदलामुळे बळीराजा हैरान झालेला असताना यंदा २० फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाचे गळीत हंगाम चालले. यामुळे बेळगाव जिल्हा साखर उत्पादनात अव्वल ठरला आहे. (Karnataka Sugar Production)

चालू वर्षात (२०२१-२२) ५०४ साखर कारखान्यांत १५१.४१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.६३ लाख टनांची वाढ झाली आहे. कर्नाटकात १४ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत ६९ साखर कारखान्यांनी ३.५९ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आणि ३१.०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

बेळगाव राज्यात अव्वल

बेळगाव जिल्ह्यात यावर्षी २६ कारखान्यांनी १.३४ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर १३.२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचा विचार करता बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुका बेडीकहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर साखर कारखाना १२.१० उसाच्या उताराला राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. बागलकोट जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी ९२.४० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ६.१२ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मुधोळ तालुक्यातील उत्तूर इंडियन केन पॉवर लि. कारखान्याने 14.44 लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, १३९ लाख टन साखरेसह कारखाना अव्वल आहे. अथणी साखर कारखाना १२.३५ मेट्रिक टन ऊस गाळप करून १.३५ लाख टन साखरेचे उत्पादन केले.

झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि लोकांच्या बदलत्या आहाराचा विचार करता येत्या पाच वर्षांत देशातील साखरेचा वापर 300 लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. देशात साखरेचा वापर दरवर्षी सरासरी २ टक्क्यांनी वाढत आहे. सध्या 290 लाख टन साखरेचा वापर होतो. 2021-22 पर्यंत 325 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बदलत्या आहारामुळे आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील गोडधोडाचा अतिरेक यामुळे देशाचा एकूण साखरेचा वापर वाढत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळप, साखर उत्पादन

कारखान्यांचे नावऊस गाळप (मे. टन)साखर उत्पादन(क्विंटल)

चिदानंद कोरे साखर कारखाना ८०५५५० ८३३४००

घटप्रभा साखर १९३८७० २०४२२००

हालसिध्दनाथ शुगर* ३२७०१०* ३६२७८०

हिरण्यकेशी शुगर* ६६९३४९* ७७८१००

कृष्णा शुगर* ४६९९४०* ४९६७३०

मलप्रभा शुगर* १५४३२०* १७२५५०

लैला शुगर* १८५५०७*१९०२२०

रेणुका शुगर (रायबाग)* २४१०२०*२४७१५०

पॅरी शुगर (रामदुर्गा)* ४२१६५०* ४४८६६०

सोमेश्वर शुगर * २२२१३०* २२६२००

सतीश शुगर १०१४१३७ ८६६२४२

उगार शुगर * १२३५१७०*, १३५९४४०

व्यंकटेश्वर शुगर* ६५७६२८* ६९७७००

अथणी शुगर १०७६६७० १११६४००

रेणुका शुगर७३५७८१ ५७४४४०

रेणुका शुगर (कोकटनूर) ८८३४८३ ६६०७१०

विश्वराज शुगर ७४०६८८ ५९३२००

गोकाक शुगर ३७२०९१ ३९८७००

शिवशक्ती शुगर१०५४२०५ १०६६३४०

शिवसागर शुगर * ६२३१०*६१७००

शिरगुप्पी साखर * ५०९२०८*५४६६०४

अरिहंता साखर २३५०१० २६८१६०

बेळगाव शुगर (हुदली) ४१५८०६ ४६२५१९

हर्षा शुगर * ४४७४४०*४७९७९०

मार्कंडेय शुगर (बेळगाव) १३२५०० १०५२००

संगम शुगर (हिडकल धरण)* १६८८५७*०

------------------------------------

एकूण* १३४३१३३० १३२१७१३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT