Sugarcane cutting stopped by farmers' association at Waddi; Sugarcane was going to a factory in Karnataka 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी संघटनेने रोखली उसतोड; वड्डी येथील प्रकार, कर्नाटकातील कारखान्याला जाणार होता ऊस

प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : कोणताही गाळप परवाना नसताना तसेच उसाच्या दराबाबत अधिकृत घोषणा झालेली नसताना कर्नाटकातील एका कारखान्याने तालुक्‍यातील वड्डी येथे एका शेतकऱ्याचा ऊस नेण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. थेट फडात जाऊन ऊसतोड कामगार वाहतूकदार उसाच्या फडातून पिटाळून लावले आणि ही तोड बंद पाडली. सांगली जिल्ह्यातील ही ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांमधील यावर्षीच्या सिझनमधील संघर्षाची पहिली ठिणगी आहे. 

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेव कोरे यांच्यासह सोबतच्या कार्यकर्त्यांनी ही तोड रोखून यापुढे साखर कारखानदारांची गुंडगिरी चालू देणार नाही असाही इशारा दिला. जोपर्यंत उसाचा दर आणि त्या बाबतचे धोरण अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत साखर कारखानदारांनी उसाच्या फडात पाऊल टाकायचे नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रति टन चार हजार रुपये फडात रोख द्यावेत आणि त्यानंतरच उसाच्या फडाला हात लावावा असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांकडे त्यांनी चौकशी केली असता त्यांच्याशीही तोडणी आणि वाहतुकीचे दर वाढवण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितल्यानंतर आमची तोडणी आणि वाहतूक दारालाही दर वाढवून देण्याची मागणी असल्याचे कोरे यांनी सांगितले.

या आंदोलनात कमलेश्वर कांबळे, प्रदीप कार्वेकर, मारुती माळी, संजय कांबळे, मिलिंद खाडिलकर,शशिकांत गायकवाड,अरुण क्षिरसागर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT