Sugarcane rates in three pieces: the first installment of 2400 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत ऊस दराचे तीन तुकडेच: 2400 चा पहिला हप्ता

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात ऊस दराचे तीन तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला असून साऱ्यांनी एकमेकांच्या संमतीने आता तो अमलात आणला आहे. त्यावर राळ उठू नये, यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर सह्या करून घेतल्या जात आहेत. पहिला हप्ता 2400 रुपये, जूनमध्ये मशागतीसाठी 200 रुपये आणि दिवाळीसाठी 200 रुपये असे तीन हप्त्यात पैसे देऊ, अशी ग्वाही कारखानदारांनी दिली आहे, मात्र आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याबाबत काही कारखानदारांनी केलेली फसवणूक पाहता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांत राज्यातील ऊस दराची कोंडी सातत्याने सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी फोडली आहे. गेल्या दोन वर्षांत ऊस दर आंदोलनात फारशी हवा राहिली नाही. त्यामुळे कारखानदारांनी मोकळा श्‍वास घेतला होता. या टप्प्यावर कारखानदारांनी पुन्हा दराचे तुकडे पाडले आहेत. शेजारील जिल्ह्यांपेक्षा आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील कारखान्यांच्या दरापेक्षा हा हप्ता कमी आहे. दुसरा आणि तिसरा हप्ता देऊ, असे सांगितले जात असले तरी त्याविषयी खात्री नसल्याने ऊस उत्पादकांचा गोंधळ उडाला आहे. राजारामबापू कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा कारखाना, विश्‍वास कारखाना या साऱ्यांनी एकच पॅटर्न राबवला आहे. 

ऊस दराचे तीन तुकडे

  • पहिला हप्ता : 2400 रुपये 
  • दुसरा हप्ता : 200 रुपये 
  • तिसरा हप्ता : 200 रुपये 

राजू शेट्टी नाराज, पण शांत 

शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी 2750 ते 2800 रुपयांची पहिली उचल दिली आहे. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात चारशे रुपये कमी दिले जात आहेत. त्याबाबत अनेकांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. ते या प्रक्रियेवर नाराज आहेत, मात्र त्यांनी तूर्त शांत राहण्याचे ठरवले आहे. शेतकरी चळवळ अडचणीत आणायची, मोडायची असे डावपेच आखले जात असल्याने शेट्टींनी थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतली आहे. 

एफआरपी शंभर टक्के दिली जाईल

सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देणेच योग्य होईल. शेतकऱ्यांनीही त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हा पॅटर्न आम्ही राबवत आहोत. एफआरपी शंभर टक्के दिली जाईल, याविषयी खात्री बाळगावी. 

- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नात्याला काळीमा फासणारी घटना! होमगार्ड मावसाचा मुलीवर अत्याचार; बाळापूर तालुक्यात खळबळ, 'ती' कायमच घाबरलेली..

Advocate Shriram Pingale : नाशिक महापालिकेची नोटीस वादाच्या भोवऱ्यात! ॲड. श्रीराम पिंगळे यांचा वृक्षतोडीला तीव्र विरोध

पुण्यात महापौरपदासाठी दावेदारांचं गुडघ्याला बाशिंग, आरक्षणाची चिठ्ठी कुणाला कौल देणार?

Local Megablock: पुढील काही तास मुंबईकरांचे होणार हाल! मेगाब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडणार; तब्बल १२० फेऱ्या रद्द राहणार

Malegaon News : मालेगाव हादरवणारे डोंगराळे प्रकरण: सोमवारपासून साक्षीदारांची तपासणी, उज्ज्वल निकम मैदानात!

SCROLL FOR NEXT