अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस

अवकाळीचा कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम

राजेंद्र हजारे

निपाणी : निपाणी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, रात्री जोराचा पाऊस या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त असला तरी सध्या तालुक्यात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद होत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला आहे.

आधीच प्रमाणापेक्षा पडलेला जास्त पाऊस अन् आता अनपेक्षितपणे पडणारा पाऊस यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चिक्कोडी तालुक्यातील सहकारी व खासगी कारखान्यांचा गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. मात्र ऐन हिवाळ्यात ऊसतोडणी हंगामात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय निर्माण केला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. २५ आक्टोम्बर दरम्यान तालुक्यात ऊसतोडणी सुरू झाली आहे.

निपाणी तालुक्यातील निपाणीसह बेनाडी, मांगूर, भोज, बेडकिहाळ, खडकलाट, जत्राट, श्रीपेवाडी, पट्टणकुडी, गळतगा, अक्कोळ भागात तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली असून मध्यरात्री जोराचा पाऊस पडत आहे. शेतात पाणी साचले असून रस्तेही चिखलम झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने अडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जुलै-ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुरामुळे व नदीकाठच्या पट्ट्यातील ऊस पिकावर परिणाम झाला आहे.

उसाची वाढ खुंटली असून ऊस पोकळ होण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी व ऊसतोड कामगारांवर आस्मानी संकट गडद झाले असून ऊस तोड करता येत नसल्याने तोडणीमजूर आपापल्या छावणीत बसून आहेत. ज्वारी, हरभरा, मका रब्बी हंगामातील पिकांना हा पाऊस उपयुक्त असला तरी ऊसतोड आणि वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम काही दिवसासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुन्हाळमालक अजूनही शांतच

दिवाळीनंतर तालुक्यातील सुरू होणारी गुन्हाळघरे अजूनही बंद स्थितीत आहेत. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, गूळ तयार करण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च व गुळाला मिळत नसलेला योग्य भाव, यामुळे गुऱ्हाळ मालकदेखील अजूनही शांतच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT