Suicide of a family member in Shrirampur 
पश्चिम महाराष्ट्र

भांडण झाल्याने मामा प्यायला किटकनाशक, भाच्याने टाकली विहिरीत उडी..पुढे घडलं असं

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्यातील एका गावात मामा-भाच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक प्यायले. तर घाबरलेल्या भाच्याने जवळील विहिरीत उडी मारली. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय 30) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय 22) हे तेथेच शेतात वस्ती करून राहतात. खंडागळे यांनी काही जमीन त्यांच्या बहिणीला दिली आहे. त्यामुळे मामा-भाचे दोघेही मिळून शेती करीत. सोमवारी पाच वाजेच्या सुमारास मामा-भाच्यात किरकोळ वाद झाला. त्यातून मामा नवनाथ खंडागळे यांनी विषारी किटकनाशक प्राशन केले. मामाने किटकनाशक पिल्याचे पाहून घाबरलेल्या भाच्याने (मनोज) जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली. 

याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जावून नवनाथ खंडागळे यांना तातडीने श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर इतरांनी विहिरीतील भाच्याचा शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने त्याचा शोध लागला नाही.

आज मंगळवारी सकाळी पोहण्यात पटाईत असलेले रावसाहेब बनकर यांनी आज विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. टाकळीभानचे पोलिस हवालदार रविंद्र पवार, गोरे, बाबा सय्यद यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविला. दरम्यान किटकनाशक पिलेल्या खंडागळे यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. मामा-भाच्यात वाद कशामुळे झाला. हे मात्र समजू शकले नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT