Suicide by jumping into the well 
पश्चिम महाराष्ट्र

सहलीला कमी पैसे दिले म्हणून...

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : सहलीला जाण्यासाठी वडिलांनी पाचशे रुपये कमी दिल्याचा राग आल्याने साकूर येथील फिरोदिया कॉलेजमध्ये एफवायबीकॉममध्ये शिकणाऱ्या सतीश जगन्नाथ घुले (वय 19, रा. पोखरी, ता. पारनेर) या मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

सतीश आई-वडिलांसमवेत पोखरी गावाजवळील वस्तीवर राहत होता. त्यांची सहल जाणार असल्याने त्याने चार दिवसांपूर्वी वडिलांकडे दोन हजार रुपये मागितले होते. मात्र, परिस्थिती गरिबीची असल्याने वडिलांनी कसेबसे त्याला दीड हजार रुपये दिले होते. त्यानंतर सतीश चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आज सकाळी विहिरीत आढळून आला. 

सतीश हुशार विद्यार्थी होता. त्याला बारावीत 78 टक्के गुण मिळाले होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. मात्र, सतीशचा स्वभाव तापट असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. जगन्नाथ घुले यांचे कुटुंबीय मूळचे संगमनेर तालुक्‍यातील माळेगावचे आहे. तेथे त्यांना शेती नसल्याने त्यांनी पोखरी परिसरात थोडी शेती घेतली होती व त्यावरच ते उदरनिर्वाह करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांचा वाढला दबदबा; जानेवारीत ई-कार, दुचाकींच्या मागणीत वाढ

Widow Pension Fraud : महिलेचा अजब कारनामा ! पतीकडून वसूल करतेय पोटगी अन् शासनाकडून विधवा पेन्शन, नेमकं प्रकरण काय?

Emotional HSC Exam Story : आईचा मृतदेह घरात असताना मुलीने दिला बारावीचा पेपर; मन सुन्न करणाऱ्या घटनेने गावकरी हेलावले

RERA : ‘रेरा’ बंद करण्यासही आमचा आक्षेप नाही; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT