atul zhende
atul zhende 
पश्चिम महाराष्ट्र

अप्पर पोलिस अधीक्षकांनी दिला मोलाचा संदेश...काय ते वाचा ?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : स्पर्धेच्या काळात रोजगाराच्या संधी खूप वाढल्या असून त्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्रत्येकांकडे असायला हवी. बाल वयात मुलांमध्ये स्टेज डेअरिंग खूप गरजेची असून सकाळ एनआयईने ही संधी मुलांना उपलब्ध करुन दिल्याचे कौतूक आहे. पालकांच्या इच्छा, अपेक्षा व त्यांच्या स्वप्नाचा वेध घेवून मुलांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अतूल झेंडे यांनी केले. 

सकाळ एनआयईतर्फे आयोजित आंतरशालेय वक्‍तृत्व स्पर्धेचे शनिवारी (ता. 18) उद्‌घाटन आयएमएस प्रशालेत श्री. झेंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवी पाटील, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, कोमल कोंडा, रामचंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. रामकृष्ण आय हॉस्पिटल हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून सारथी युथ फाउंडेशन सहप्रायोजक आहे. श्री. दिवाणजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 


श्री. झेंडे म्हणाले, पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा. पालकांचेच अनुकरण मुले करीत असतात. सोशल मिडियाच्या अन्‌ स्पर्धेच्या काळात मुलांसोबतचा संवाद हरवत चालला आहे. पालकांनी मुलांच्या इच्छा, अपेक्षा, त्यांचे स्वप्न व त्यांची आवड विचारात घ्यायला हवी. मुलांनी आई-वडिलांचे संस्कार विसरु नयेत, कितीही मोठे झाला तरीही देशाचे चांगले नागरिक बना, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. यश-अपयशानंतरही शालेय स्पर्धांमध्ये मुलांनी आवर्जुन सहभागी व्हावे, असा संदेशही त्यांनी दिला. 


बदल घडविण्याची मुलांमध्ये क्षमता 
पालकांनी स्वयंशीस्त पाळल्यास मुले त्याचे अनुकरण करतात. वाहन चालविताना पालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास मुलांनी त्यांना ठणकावले पाहीजे. मुलांनी आता पालकांना शिकविण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना भविष्याच्या दृष्टीने शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचीही गरज असून त्यातून आत्मविश्‍वास निर्माण होतो. वक्‍तृत्व यासह अन्य कौशल्य मुलांमध्ये असल्यास निश्‍चितपणे त्याला यश प्राप्त होते. 'सकाळ'चे विविध क्षेत्रातील काम खूप कौतूकास्पद असल्याचे वि. गु. शिवदारे कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवी पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT