Superstitions At Mandhardev 
पश्चिम महाराष्ट्र

Video : येथे आजही अंधश्रध्‍देचा कहरच...

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोणावर तरी करणी करण्याच्या उद्देशाने मांढरदेव डोंगरावरील मंदिराच्या परिसरातील झाडांना आजही सुया, टाचण्यांसह खुपसलेली लिंबे, काळ्या बाहुल्या ठोकल्या जात आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी झाडाला ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, फोटो, खिळे, दाभणे असे साहित्य दोन पोती भरून काढून जाळून टाकले. 

मांढरदेवी येथील काळूबाई यात्रा गुरुवारी (ता. नऊ) सुरू होत आहे; पण त्याच ठिकाणच्या परिसरात करणीच्या नावाने झाडाला काळ्या बाहुल्या व टोचलेल्या टाचण्या, चिठ्ठ्या, बिब्वे, लिंबू खिळ्याच्या व दाभणाच्या साहाय्याने झाडाला ठोकल्या जातात. जिवंत कोंबड्यांना दोराच्या साह्ययाने झाडाला लटकविले जाते. हे प्रकार अंधश्रद्धेतून घडत आहेत. या प्रकाराला आळा बसणे गरजेचे आहे. अशा गोष्टी करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा बोर्डही येथे लावण्यात आला आहे; पण त्याला कोणीही जुमानत नाहीत. मंदिराच्या पाठीमागील झाडे अशा करणीच्या प्रकारांनी भरून गेली आहेत. 

अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी मंदिराचे विश्‍वस्त, प्रशासनाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मत समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. येथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये. या प्रकारांना आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रशांत पोतदार (राज्य प्रधान सचिव), नंदिनी जाधव (पुणे जिल्हा, कार्याध्यक्ष), सुभाष सोळंखी, भगवान रणदिवे, वंदना माने, राम सर्वगोड, भगवान काळभोर, श्रीराम नलावडे, ऍड. धुमाळ यांनी नुकतेच मांढरदेव येथे जाऊन झाडाला ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, फोटो, खिळे, दाभणे, काढून जाळून टाकली. या यात्रेला महाराष्ट्रभरातील भाविक येत असतात. करणीच्या नावाने जर कोणी बाहुल्या, फोटो लावून जर असे कृत्य करतील तर त्यांच्यावर जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा. प्रशासनाने वेळीच त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT