The support given to the destitute 
पश्चिम महाराष्ट्र

कुणी नकोसे तर कुणाचे हरपले छत्र

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः जन्मतःच कुरूप दिसणाऱ्या श्रद्धाला आठ दिवसांची असतानाच आई-वडिलांनी सोडून दिले. वडील मद्यपान करून रोज अमानुष मारहाण करू लागल्याने हादरून गेलेल्या, सातवीत शिकणाऱ्या संध्याला आता घरच्या आठवणी नकोशा वाटतात. आई-वडिलांचे निधन झाल्याने जबाबदारी नको म्हणून नातेवाइकांनी भावंडांना स्मशानभूमीजवळ सोडून दिले. पोटाची खळगी भरताना दमछाक झालेल्या आईला सांभाळता येईना; मग जगण्यासाठी मुलांना तिच्या मायेची ऊब सोडावी लागली. आई-वडील ऊसतोडणीला जातात. सांभाळायला कुणीच नाही; मग त्यांच्या मुलांना मायेची ऊब येथे मिळाली... 


जिवाला चटका लावणाऱ्या अशा विविध कहाण्या असलेल्या शंभराहून अधिक मुलांना येथील साई आश्रया अनाथाश्रमात सुरक्षित निवारा मिळाला आहे. आश्रमाचे संचालक गणेश दळवी पत्नी व आईच्या सहकार्याने या मुलांचे संगोपन करतात. 
रोटरी क्‍लबचे अध्यक्ष निखिल बोरावके, अभियंता शरद निमसे, डॉ. एम. वाय. देशमुख, उद्योजक राजेंद्र कोते व अभय दुनाखे यांनी या मुलांना चादरी व ब्लॅंकेट नुकतेच भेट दिले. त्या वेळी दळवी यांनी यातील काही मुलांच्या कहाण्या सांगितल्या. त्या वेळी त्या मुलांचे डोळे भरून आले. 


दळवी म्हणाले, ""दोन भावंडांच्या आई-वडिलांचे अपघाती निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर नातेवाइकांनी, जबाबदारी नको म्हणून दोन्ही मुलांना स्मशानभूमीजवळ सोडून दिले. हा प्रसंग पाहून मी हादरून गेलो. त्यांना घेऊन घरी आलो. त्यातून साई आश्रया अनाथाश्रमाची सुरवात झाली. श्रद्धाला जन्मतः नाक नव्हते. ती भेसूर दिसायची. आठ दिवसांची असताना द्वारकामाई मंदिराजवळ सापडली. तिच्यावर सात शस्त्रक्रिया केल्या. आता छान दिसते. पहिलीत शिकते. यापेक्षा आनंद आणि समाधान ते काय असते? आजवर आश्रमातील तीन मुलींचे विवाह झाले. दानशूर भाविक व आश्रमाच्या हितचिंतकांच्या मदतीवर या सर्व मुलांचा संगोपनाचा खर्च भागवतो. साई संस्थानातर्फे मुलांना रोज भोजन पाठविले जाते. 

 इमारतीचे काम सुरू
कोपरगाव येथील समता पतसंस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांनी साई आश्रया अनाथाश्रमासाठी एक एकर जमीन दिली. त्यावर आश्रमाच्या इमारतीचे काम सुरू आहे. अनाथ महिला व वृद्धांचेही आम्ही संगोपन करायला सुरवात केली आहे. नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले, की जागेची अडचण दूर होईल. मुलांसाठी अभ्यासिका, क्रीडांगण व अन्य सुविधा उपलब्ध होतील. 
- गणेश दळवी, संचालक, साई आश्रया अनाथाश्रम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT