barti.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात बार्टी मार्फत 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण 

विष्णू मोहिते


सांगली, ः जिल्ह्यातील सात समतांदूतामार्फत 416 ग्रामपंचायतीतील 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात उर्वरित गावांचे सर्वेक्षण पूर्ण होईल, अशी माहिती बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी दिली. 

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 59 अनुसूचित जाती नामशेष होणाऱ्या जातींना इतर जातीच्या प्रवाहात येण्यासाठी सांगली जिल्ह्यात काम सुरु झाले आहे. जिल्ह्यात सात समतांदूतामार्फत गावनिहाय 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील तालुक्‍यात कार्यरत असलेल्या समतांदूतांच्याकडून तालुक्‍यातील गटविकास अधिकारी व गावातील ग्रामसेवकांच्या सहकार्याने 59 अनुसूचित जातीच्या विकासासाठी अधिक प्रभावी योजना व उपक्रम राबवण्यासाठी गावनिहाय अनुसूचित जातीचा सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे. बार्टी, या स्वायत्त संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीच्या विकासासाठी व उत्थानासाठी कार्य केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती मधील समाविष्ट 59 जातींपैकी महार, मांग, चांभार, मेहतर, वाल्मिकी, ढोर, अशा मोजक्‍याच जातीबाबत समाजात माहिती असते. परंतु या जाती व्यतिरिक्त 59 जातींतील काही जाती राज्यातून नामशेष होताना दिसून येत आहे. म्हणून आशा जातीचा शोध घेऊन त्याची सध्यपरिस्थिती जाणून घेऊन संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. जेणेकरून या इतर जाती देखील विकासाच्या प्रवाहात येतील. या सर्वेक्षणासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. परंतु आरोग्याची काळजी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून समतादूत अंकुश चव्हाण, सागर आढाव, आबासाहेब भोसले, विक्रांत शिंदे, सविता पाटील, लता सुरवसे, शहाजी पाटील विशेष परिश्रम घेत आहेत. 
................. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पोलिसांचे कपडे घालायचा अन्...मुंबईत बनावट 'क्राइम ब्रांच ऑफिसर' पक्याला अटक, काय आहे प्रकरण?

Indian Martial Arts: पाच वर्षांच्या रिद्धीचा सिलंबममध्ये जागतिक विक्रम; दोन्ही हातांनी ११४ पेक्षा अधिक सलग रोटेशन पूर्ण

Pune News : पोटातून निघाला २८० ग्रॅमचा केसांचा 'पसरलेला गोळा'; पुण्यात 'रपुंझेल सिंड्रोम'वरील दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

Barshi fraud:'बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक'; ऊसतोडीसाठी मजूर पुरवणाचे आश्वासन, मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

Sahyadri Adventure: नऊ वर्षांच्या मुलीने सर केला सह्याद्रीतील भैरवगड; रेवा रामदासीचे साहस

SCROLL FOR NEXT