Former MP Raju Shetti esakal
पश्चिम महाराष्ट्र

कारखानदारांनी 'हे' सिद्ध केल्यास 5 तोळे सोने, 1 लाख, एक कार देऊ अन् त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू; 'स्वाभिमानी'चं चॅलेंज

Swabhimani Shetkari Saghtana : गळीत हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा डोके वर काढणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनेकवेळा ऊस दरासाठी आंदोलने केली. काही वेळा यश आले. काही वेळा आले नाही तरीही लढण्याचे एक लोक थांबवत नाहीत.

नवेखेड : उसाला प्रतिटन (Sugarcane Rate) ४ हजार दर देता येतो. कोणत्याही कारखानदारांने हे खोटं आहे हे सिद्ध केल्यास पाच तोळे सोने, एक लाख रुपये, एक कार व त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) कार्यकर्त्यांनी दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनेकवेळा ऊस दरासाठी आंदोलने केली. काही वेळा यश आले. काही वेळा आले नाही तरीही लढण्याचे एक लोक थांबवत नाहीत. गळीत हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा डोके वर काढणार आहे.

अलीकडील १०-१५ वर्षांत बियाणे मजुरी पाणीपट्टी, रासायनिक खतांचे दर वारेमाप वाढले. त्यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च वाढला. पर्यायाने ऊस दर म्हणावा तसा वाढला नाही. एकरी ऊस उत्पादनाचा लागणीपासून तोडणीपर्यंतचा खर्च एकरी ८० हजार ते लाखापर्यंत गेला आहे. कारखाने ३००० ते ३२०० दर देत आहेतय हा दर उत्पादकांना न परवडणारा आहे. साखरेचा खुल्या बाजारातील दर वाढलेला असतो. उपपदार्थ निमिर्तीमधून ही चांगला फायदा होतो. तरीही वाढीव दर देताना कारखानदार एक होतात. प्रत्येकजण १०-२० आणि ५० रुपयांच्या फरकात दर देऊन उत्पादकांना फसवतात.

जो कारखाना टनाला ४ हजार हजार रुपये दर देईल. त्या कारखानदारांना ५ तोळे सोने, एक चारचाकी, रोख १ लाख व हत्तीवरून मिरवणूक काढू.

-दिलीप पवार, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. टनाला ३ हजार ते ३२०० दर न परवडणारा आहे. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचे हे आव्हान कारखानदारांनी स्वीकारावे.

-भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

जमा प्रति टन

  • एक टनापासून १२५ किलो साखर निर्मिती १२५ ×३७ = ४६२५

  • एक टन उसातून ४० किलो मळी तयार होते ४० किलो मळीतून १० लिटर स्पिरिट होते. २५ लिटर मद्य तयार होते. २५ × २०० = ५०००

  • इथेनॉल(बी हेवी) एक टक्का रिकव्हरीमधुन ९ लिटर इथेनॉल तयार होते. ते तयार करण्यासाठी खर्च फक्त ७२ रुपये येतो. खर्च वजा जाता ४७४.२५ रुपये मिळतात.

  • बगॅस प्रति टनास ७० किलो.

  • दर २ रुपये = १४० रुपये कोजन टनास १२५ रुपये २६५ मिळतात.

एकूण जमा रक्कम १०३६४.७५

खर्च असा प्रति टन

  • तोडणी खर्च ७५०

  • प्रक्रिया खर्च नोकर पगार, अबकारी निधी व्हॅट भरणा ५००

  • कारखान्याच्या कर्जावरील व्याज २००.

  • असा एकूण खर्च १४५०

  • एकूण उत्पादन १० हजार ३६४.७५ - एकूण खर्च १ हजार ४५०. म्हणजे मिळणारी रक्कम ८९१४.७५. आणखी ५० टक्के सोडली तर ४ हजार ५०० असा दर देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? राज तर सोडा, उद्धव सोबतही आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

Latest Marathi News Live Update : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

SCROLL FOR NEXT